फळ विक्रीच्या क्रेटखाली देशी दारुची तस्करी, 2 लाख 80 हजारांचा साठा जप्त
पोलीस पथकाने या वाहनांची तपासणी केली असता वाहनात प्लास्टिक फळ विक्रीच्या क्रेटखाली सुमारे 28 बॉक्स देशी दारु एका प्लास्टिकच्या पोत्यात भरुन ठेवलेली आढळली.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील गिरनार चौकात 2 लाख 80 हजारांचा (Chandrapur Liquor Seized) देशी दारु साठा जप्त करण्यात आला आहे. फळ वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक क्रेटच्या खाली ही देशी दारु आढळली आहे. दारु तस्करीसाठी भंडारा जिल्ह्याचा क्रमांक असलेले एक पिकअप वाहन शहरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी नेहमीप्रमाणे आपली नाकाबंदी लावली तेव्हा भाना पेठ वार्डातील संताजी सभागृहाच्या चौकात ही संशयित गाडी उभी होती (Chandrapur Liquor Seized).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
पोलीस पथकाने या वाहनांची तपासणी केली असता वाहनात प्लास्टिक फळ विक्रीच्या क्रेटखाली सुमारे 28 बॉक्स देशी दारु एका प्लास्टिकच्या पोत्यात भरुन ठेवलेली आढळली.
या वाहनाची सर्व अंतर्गत विद्युत तार यंत्रणा कापली होती. पोलिसांनी हे वाहन दुसऱ्या वाहनाचा वापर करत शहर पोलीस ठाण्यात जमा केले. प्राथमिक तपासात वाहनाचा चालक आणि दारु तस्कर फरार झाल्याचे निष्पन्न झाले. रिकाम्या क्रेटच्या वाहतुकीआड दारु तस्करीचा नवा फंडा या घटनेने उघड झाला आहे.
आधी फ्रेंड रिक्वेस्ट, मग अश्लील फोटो, पुण्यापासून रत्नागिरीपर्यंत जाळं, बारामतीच्या तरुणाला बेड्याhttps://t.co/URnhrQEO81
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2020
Chandrapur Liquor Seized
संबंधित बातम्या :
नागपुरात पशु खाद्याच्या आड दारुची तस्करी, 51 लाखांचा माल जप्त
sanitizer | दारु न मिळाल्याने सॅनिटायजर प्यायला, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू