70 लाख खर्चून केले लिंग परिवर्तन, गे पार्टनरने लग्नास दिला नकार, अखेर असे काही केले की…

सेक्सचेंजचे ऑपरेशन केल्यानंतर लग्नास नकार दिल्यानंतर चिडलेल्या एका तरुणाने आपल्या गे पार्टनराच्या खूनाची सुपारी एका गुंडाला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गे पार्टनरच्या घरापर्यंत जाऊनही तो सापडला नसल्याने त्यांनी त्याच्या वडीलांचे नुकसान करुन दूधाची तहान ताकावर भागविण्याचा प्रयत्न केला. परंतू एका चुकीमुळे अखेर पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचले.

70 लाख खर्चून केले लिंग परिवर्तन, गे पार्टनरने लग्नास दिला नकार, अखेर असे काही केले की...
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 8:48 PM

कानपूर | 5 मार्च 2024 : त्याने आपल्या गे पार्टनर सोबत लग्न करण्यासाठी 70 लाख खर्च करुन स्वत:ची लिंग परिवर्तन शस्रक्रिया केली. परंतू शस्रक्रिया केल्यानंतर त्याच्या गे पार्टनर लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या पार्टनरने आपल्याशी बेवफाई करणाऱ्या जोडीदाराला धडा शिकविण्यासाठी शेकडो किलोमीटरचे अंतर कापत त्याचे घर गाठले परंतू तेथे त्याचा साथीदार काही सापडला नाही, मग त्याने गे साथीदाराच्या वडीलांची कारच पेटवून दिली. त्यानंतर त्याने कानपूर सोडून पळून जायचा प्रयत्न केला, परंतू त्याला अखेर पोलिसांनी पकडले.

उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये वेगळेच विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे. आपल्या गे पार्टनरसाठी एका तरुणाने लैंगिक शस्रक्रिया करुन लिंग परिवर्तनाची शस्रक्रिया केली. त्यासाठी तब्बल 70 लाख त्यावर खर्च केले. परंतू या त्याच्या गे पार्टनर लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या तरुणाने मध्य प्रदेशातील इंदूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणूकीची आणि जबरदस्तीने अनेसर्गिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर एका साथीदाराच्या मदतीने तो इंदूरवरुन थेट उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये आपला गे साथीदार वैभव शुक्ला याला मारण्याची कट रचून आला. परंतू वैभव शुक्ला जेव्हा त्याच्या घरी सापडला नाही. तेव्हा आरोपीचा चडफडाट झाला, त्याने मग रागाच्या आणि बदल्याच्या रागात पार्किंगमध्ये पार्क केलेली शुक्ला याच्या वडीलांची कार पेटवून दिली. ही घटना आजूबाजूच्या सीसीटीव्हीत कैद झाली.

वैभव शुक्ला याचे वडील अनुप शुक्ला यांनी या प्रकरणाची तक्रार स्थानिक पोलिस स्थानकात दाखल केली. पोलिसांनी त्यांनी सांगितले की त्यांची कोणाशीही दुश्मनी नाही. परंतू त्यांचा मुलगा वैभववर इंदूरमध्ये एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांना तपासात समजले. हा क्लू सापडताच पोलिसांनी तपास करीत आरोपीपर्यंत पोहचले. पोलिसांनी सीसीटीव्हीत आरोपींचा चेहरा दिसल्यानंतर त्याचे लोकेशन ट्रेस केले. कानपूरपासून चाळीस किमीवर एका बसमधून तो जात असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडले.

पार्टनरची सुपारी दिली

दोघांची पोलीसांनी चौकशी केली. दीप याचे कानपूरचा रहीवासी असलेल्या वैभव याच्याशी समलैंगिक संबंध होते. दोघांना लग्न करायचे होते. दीपने इंदूरमध्ये 70 लाख खर्च करुन लिंग परिवर्तनाची शस्रक्रिया केली. परंतू काही कारणान त्यांच्यात ब्रेकअप झाले. वैभवने लग्नाचे वचन तोडल्याने दीपने हा प्रकार केल्याचे डीसीपी एस.के.सिंह यांनी सांगितले. वैभव याच्यावर 377 चा गुन्हा दाखल होऊनही पोलिस त्याला अटक करीत नव्हते त्यामुळे चिडलेल्या दीप याने वैभव याला मारण्यासाठी इंदूर येथील एक सराईत गुन्हेगार रोहन यादव याची मदत घेतली. रोहनवर 17 गुन्हे दाखल आहेत. रोहनला सोबत घेऊन इंदूरहून कानपूरला आला, त्यानंतर पाचशे रुपयांत स्कूटी बुक केली. तेथे घरात तो सापडला नाही. अखेर वैभव याच्या वडीलांची कार पेट्रोल टाकून पेटवुन दिली आणि ते दोघे पळून गेले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.