Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : फिल्मसिटी दाखवण्याच्या बहाण्याने परदेशी पर्यटकांची फसवणूक, पाहा फिल्मसिटीच्या गेटवर उभे राहून काय सांगितलं…

गुवाहाटी येथे राहणारा फैजुर रहमान पहिल्यांदाच मुंबईत आलाय, विशेष म्हणजे प्रसिद्ध असलेली फिल्मसिटी त्याला पाहायची होती. त्याचवेळी आरोपी रोहित आणि डेन्झिल फिल्मसिटीच्या गेटवर उभे होते

Mumbai : फिल्मसिटी दाखवण्याच्या बहाण्याने परदेशी पर्यटकांची फसवणूक, पाहा फिल्मसिटीच्या गेटवर उभे राहून काय सांगितलं...
दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 1:25 PM

मुंबई : पर्यटकांना (tourists) फिल्मसिटी (Mumbai Filmcity) दाखवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी (Dindoshi)अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पर्यटकांना फिल्मसिटी दाखवण्याच्या बहाण्याने दोन परदेशी नागरिक आणि गुवाहाटीतील एका व्यवसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रोहित कासारे आणि डेन्झिल फर्नांडिस उर्फ डेन्झो अशी आरोपीची नावे आहेत. दोघांनी पैसे उकळण्याच्या बहाण्याने हे कृत्य केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

गुवाहाटी येथे राहणारा फैजुर रहमान पहिल्यांदाच मुंबईत आलाय, विशेष म्हणजे प्रसिद्ध असलेली फिल्मसिटी त्याला पाहायची होती. त्याचवेळी आरोपी रोहित आणि डेन्झिल फिल्मसिटीच्या गेटवर उभे होते, दोघांनीही फैजुर रहमानला गाईड असल्याचे सांगितले. त्यानंतर फैजुर रहमान त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाल्यानंतर फिल्मसिटी दाखवण्यासाठी 1500 रुपयांची मागणी केली.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर रोहित कासारे आणि डेन्झिल फर्नांडिस या दोघांनी दोन परदेशी लोकांना एकत्र करून कारमध्ये बसवले. त्यानंतर फिल्मसिटी दाखवण्याचा बहाणा करून आरे कॉलनी वनपरिक्षेत्रात फेरफटका मारला. फैजुर रहमानने आरोपीला फिल्मसिटी दाखवण्यास सांगितले. तेव्हा आरोपीने प्रत्येक व्यक्तीमागे 1500 रुपये पुन्हा मागितले.

पर्यटकांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोन्ही आरोपींनी फिल्मसिटी गेटवरुन पळ काढला. पर्यटकांनी या घटनेची तक्रार दिंडोशी पोलीस दिली. त्यानंतर पोलिसांनी रोहित कासारे आणि डेन्झिल फर्नांडिस दोघांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती एपीआय चंद्रकांत घार्गे दिली.

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....