नागपूर : बेरोजगारी कमी व्हायचं नाव घेत नाही. त्यात नोकरीच्या (Jobs) नावाखाली फसवणूक (Fraud) झालेल्या घटना देखील वाढत चालल्या आहेत. अनेक ठिकाणी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केली जातीये. अशीच एक घटना घडलीये नागपुरात. डब्लुसीएल आणि एसबीआय (SBI) मध्ये नोकरीचे आमीष दाखवून कोट्यावधीची फसवणूक करण्यात आलीये. फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात नागपूर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवलंय.नागपूर जिल्ह्यातील 12 जणांची फसवणूक करण्यात आलीये. या संदर्भात तीन आरोपींना अटक करण्यात आलीये.
दरम्यान काही दिवसांपूर्वी नागपुरात जमीन विक्रीच्या नावाखाली 18.22 कोटींची फसवणूक प्रकरणात नागपूर पोलिसांच्या आर्थिक शाखेनं चार जणांच्या घरांची झाडाझडती घेतली. यात सीएम नारायण डेमले, विजय रमाणी, गौरीशंकर सच्चानी आणि कमलेश दाढे यांच्या घरांचा समावेश आहे. चिंचभवन परिसरातील जमीन विक्रीच्या नावाखाली व्यावसायिक अली आणि वासाडे यांची 18.22 कोटींची फसवणूक केली. न्यायालयाच्या आदेशाने सीए डेमले, त्यांचा मुलगा अतुल डेमले, विजय रमाणी, गौरीशंकर सच्चानी आणि कमलेश दाढे विरोधात गुन्हा सदर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय. याच प्रकरणात नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं धाडसत्र राबवलंय. या धाडीत काही कागदपत्र सापडल्याची माहिती आहे. दरम्यान जमिनीचा व्यवहार करून सीए डेमले आणि रमाणीसह नागपुरातील अनेक लोकांची फसवणूक केलीय असा आरोप तक्रारदार नावेद अली यांनी केलाय.