नर्सिंगला प्रवेश मिळवून देतो सांगत विद्यार्थिनींची फसवणूक, दोघा भावांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सध्या सर्वत्र महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. यामुळे प्रवेशाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे.

नर्सिंगला प्रवेश मिळवून देतो सांगत विद्यार्थिनींची फसवणूक, दोघा भावांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नर्सिंगला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 3:35 PM

नागपूर : नर्सिंगला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनींची फसवणूक करणाऱ्या दोघा भावांना नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी भावांनी अनेक मुलींची फसवणूक केल्याची माहिती मिळते. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूक झालेल्या मुलींना पुढे येऊन तक्रार देण्याचं आवाहन केलं आहे. सुचित वालदे आणि संदेश वालदे अशी दोघा भावांची नावे आहेत. आरोपींकडून 1 लाख 60 हजाराची रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.

पैसे घेतले मात्र प्रवेश दिला नाही

नागपुरात नर्सिंगला प्रवेश मिळवून देण्यासाठी सूचित आणि संदेश वालदे या दोघा भावांनी चार ते पाच मुलींकडून पैसे घेतले होते. मात्र मुलींचे अॅडमिशन झालेच नाही. यानंतर या मुलींनी त्यांच्याकडे पैसे परत मागितले, मात्र आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. चार ते पाच मुलींनी याची तक्रार पाचपावली पोलिसात दिली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी त्यांचा शोध सुरु केला.

तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलीस तपासात आरोपींनी याआधीही अनेक मुलींना फसवल्याचं निष्पन्न झालं आहे. आरोपींकडून दीड लाखांची रोकडही जप्त केली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. सध्या महाविद्यालयीन प्रवेशाचा काळ असल्याने आणि विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मोठी चढाओढ सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.