तुमच्या घरात शेष नागाचं विष, काढून देतो…नागपुरात भोंदूबाबाला अटक
राज्यात आतापर्यंत अनेक भोंदुबाबांचा भांडाफोड झालाय. मात्र. त्यानंतरही प्रत्येकवेळी नव्या भोंदुकडून होणारी फसवणूक झाल्याचं समोर येतं.
नागपूर : राज्यात आतापर्यंत अनेक भोंदुबाबांचा भांडाफोड झालाय. मात्र. त्यानंतरही प्रत्येकवेळी नव्या भोंदुकडून होणारी फसवणूक झाल्याचं समोर येतं. नागपूरमध्ये असाच एक प्रकार समोर आलाय. तुमच्या मुलाला भूतबाधा झाली असून तुमच्या घरात गुप्त धन आहे. त्यावर शेष नागाचं विष आहे, अशी भीती दाखवत एका भोंदुने एका महिलेची 1 लाख रुपयांची फसवणूक केलीय. आरोपीने पीडित महिलेला भीती दाखवत पुजेसाठी 4 लाख रुपयांची मागणी केली. यानंतर पीडित महिलेकडून 1 लाख रुपये उकळले. मात्र, अखेर गिट्टीखदान पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक केलीय. या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे (Cheating of women using superstition of Sheshnag in Nagpur).
नागपूरच्या दाभा परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरी दोन भोंदू बाबा पोहचले. त्यांनी महिलेला विश्वासात घेतलं आणि तिला तुझ्या मुलाला भूतबाधा झाल्याचं सांगितलं. तुझ्या घरात गुप्त धन असून त्यावर शेष नागचं विष आहे. ते आम्ही काढून देतो. त्यासाठी देवाच्या जवळ पूजा करावी लागेल. त्यासाठी 4 लाख रुपये खर्च येईल, असंही सांगितलं.
महिला आरोपींच्या जाळ्यात फसली आणि तिने पुजेसाठी 1 लाख रुपये दिले. तसेच उर्वरित पैसे नंतर द्यायचं ठरलं. मात्र, त्यांच्याकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्यानं तिला संशय आला. तिने सगळी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी संबंधित 2 आरोपींपैकी एकाला अटक केली. राज मंदी असं या आरोपीचं नाव आहे. दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
भोंदू बाबांकडून फसवणूक झाल्याच्या कित्येक घटना रोज ऐकायला मिळतात. मात्र, तरीही या महाराजांच्या जाळ्यात फसणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहणं आणि त्यांच्या भूलथापांना बळी न पडणं हाच एक पर्याय आहे.
हेही वाचा :
‘अल्लाचा प्रकोप होईल’ अशी भीती दाखवत 15 लाखांची फसवणूक, वसईत 2 भामटे गजाआड
पुण्यात ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर, सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जादूटोणा झाल्याचा दावा
म्हशीवर करणी केल्याचा समज, बीडमध्ये चिमुकल्याची हत्या, भावकीतील दाम्पत्य अटकेत
व्हिडीओ पाहा :
Cheating of women using superstition of Sheshnag in Nagpur