जिथे आईचा मृत्यू झाला, त्याच ठिकाणी अपघातामध्ये मुलाचा मृत्यू, लोकं म्हणतात…
अपघात झाल्यानंतर या घटनेची माहिती मुलाच्या घरच्यांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांना सुद्धा या अपघाताची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले.
दत्ता कानवटे, छत्रपती संभाजीनगर : रात्री एक असा अपघात (Car Accident) घडला आहे. त्यामुळे सगळे विचारात पडले आहेत. जिथं आईचा सात वर्षापुर्वी मुत्यू झाला होता. त्याचं ठिकाणी मुलाचा मृत्यू (young boy death) झाला आहे. त्यामुळे कुटुंबियांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. एकाच जागी मायलेकरांचा मृत्यूमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) चर्चेला उधान आले आहे. स्थानिक लोकं म्हणतात की, जीवघेण्या अपघाताची घटना एकाच ठिकाणी आणि एकमेकांचे असणारे नाते यामुळे सर्वांना हा अपघात विचार करायला लावणारा आहे. घरची झोपल्यानंतर मुलाने गुपचूप गाडी बाहेर काढली होती. मुलाचं नाव सोहम निरज असं आहे.
आईचा सात वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी…
छत्रपती संभाजीनगर येथे घडलेला अपघात सर्वांना विचार करायला लावणारा आहे. जेथे आईचा सात वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी मुलाचा देखील कार अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. बहीण आणि वडील झोपल्यानंतर गुपचूप गाडी बाहेर काढून सोहम निरज नवले हा मुलगा गाडी घेऊन गेला बाहेर निघाला होता. सात वर्षांपूर्वी आईचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी मुलाचा देखील अपघात होऊन मृत्यू झाला आहे. जीवघेण्या अपघाताची घटना एकाच ठिकाणी आणि एकमेकांचे असणारे नाते यामुळे सर्वांना हा अपघात विचार करायला लावणार आहे.
घरचे झोपल्यानंतर मुलगा रात्री कुठे निघाला होता
अपघात झाल्यानंतर या घटनेची माहिती मुलाच्या घरच्यांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांना सुद्धा या अपघाताची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. मुलाचा मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे घरचे झोपल्यानंतर मुलगा रात्री कुठे निघाला होता. याची पोलिस कसून चौकशी करणार आहेत. पोलिसांनी मुलाचा मोबाईल आणि इतर काही संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.