वैद्यकीय शिक्षण नसतांना शासनाला चुना लावला, वैद्यकीय अधिकारी म्हणून पाच वर्षे वावरला, प्रकरण ऐकून धक्काच बसेल
मोहसिन खान शेरखान पठाण असं फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय शिक्षण न घेता आरोग्य विभागात तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होता.
छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर नसतांनाही एका तरुणाने केलेला गुन्हा पाहून शासकीय अधिकारीच काय पोलिस प्रशासनही चक्रावून गेले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड येथील तरुणाने तब्बल पाच वर्षे रुग्ण सेवा केली आहे. विशेष म्हणजे कुठेलेही वैद्यकीय शिक्षण न घेता त्याने वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. हा संपूर्ण प्रकार कागदपत्रे तपासणीत समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर सिल्लोडच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे शासकीय सेवेत असतांना त्याने रुग्ण तपासले असून त्यांच्यावर उपचार देखील केले आहे. मात्र, आरोग्य विभागातील हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सिल्लोड पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जात आहे.
मोहसिन खान शेरखान पठाण असं फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय शिक्षण न घेता आरोग्य विभागात तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होता.
तब्बल पाच वर्षे आरोग्य अधिकारी म्हणून मोहसिन खान शेरखान पठाण हा आरोग्य विभागात वावरत होता. काही दिवसांपूर्वी कागदपत्रांची तपासणी मोहीम पार पडली त्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सिटी चौक पोलिस ठाण्यात त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास केला जात आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभयकुमार धानोरकर यांनी याबाबत पोलिसांना कळविले होते.
डॉ. धानोरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसिन खान शेरखान पठाण हा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तालुका आरोग्य अधिकारी म्हणून बिनधास्तपणे वावरत होता.
मोहसिन खान शेरखान पठाण याची आत्तापर्यन्त कंत्राटी पद्धतीने दोन वेळेला नियुक्ती झाली आहे. गेली पाच वर्षे काम करत होता. या पदाकरिता किमान शिक्षण हे बीएएमएस असणे बंधनकारक होते, ते त्याने बनावट सादर करत नोकरी मिळवली होती.
मात्र, तब्बल पाच वर्षांनी तपासणी करत असतांना त्याने बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले असून खळबळ उडाली आहे. खरंतर वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण न घेता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेकांची धडपड असते त्यांनाही धडकी भरणार आहे.
मात्र, या प्रकारा नंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपासात आणखी कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सिटी चौक पोलिस या प्रकरणाचा अधिकचा तपास करीत आहे.