DHFL Case : छोटा शकिलचा निकटवर्तीय अजय नावंदरला अटक, सीबीआयला मोठे यश

सीबीआयने 8 जुलै रोजी नावंदर याच्या ठिकाणांवर छापा टाकला होता. यावेळी, सुमारे 350 दशलक्ष किमतीची मौल्यवान घड्याळे, पेंटिंग्ज आणि रोलेक्स ऑयस्टर, कार्टियर, ओमेगा आणि हब्लॉट मिशेल कोर्से यांसारखी शिल्पे जप्त करण्यात आली.

DHFL Case : छोटा शकिलचा निकटवर्तीय अजय नावंदरला अटक, सीबीआयला मोठे यश
छोटा शकिलचा निकटवर्तीय अजय नावंदरला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 11:28 PM

नवी दिल्ली : डीएचएफएल फसवणूक प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय (CBI)ला मोठे यश आले आहे. डीएचएफएल (DHFL)शी संबंधित 34 हजार 615 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणातील आरोपीला सीबीआयने आज अटक (Arrest) केले आहे. अजय रमेश नावंदर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नावंदर हा दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलचा निकटवर्तीय मानला जातो. सीबीआय लवकरच त्याची चौकशी करू शकते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 8 जुलै रोजी झालेल्या चौकशीदरम्यान नावंदरची सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

नावंदरच्या ठिकाणांवर सीबीआयचा छापा

सीबीआयने 8 जुलै रोजी नावंदर याच्या ठिकाणांवर छापा टाकला होता. यावेळी, सुमारे 350 दशलक्ष किमतीची मौल्यवान घड्याळे, पेंटिंग्ज आणि रोलेक्स ऑयस्टर, कार्टियर, ओमेगा आणि हब्लॉट मिशेल कोर्से यांसारखी शिल्पे जप्त करण्यात आली. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, झडतीदरम्यान जप्त करण्यात आलेली मौल्यवान वस्तू डीएचएफएलच्या कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या मालकीची आहेत. सीबीआयने या प्रकरणी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL), त्याचे सीएमडी कपिल वाधवान, संचालक धीरज वाधवान आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बँक घोटाळ्याप्रकरणी डझनभरहून अधिक ठिकाणी छापे

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अजय रमेशला न्यायालयात हजर करून रिमांड घेण्यात येणार आहे. रिमांडवर चौकशीदरम्यान त्याच्याकडून ही घोटाळ्यातील हा पैसा कोठून कोठे पाठवण्यात आला याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच घोटाळ्यातील पैशांचा संबंध अंडरवर्ल्डशी आहे का याचाही तपास सीबीआय करत आहे. 22 जून 2022 रोजी सीबीआयने 34 हजार कोटी रुपयांच्या या बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंदवून डझनभरहून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. (Chhota Shakeels close aide Ajay Navander arrested by CBI in connection with DHFL scam)

हे सुद्धा वाचा

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.