Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिकनची पार्टी जीवावर बेतली, पार्टीसाठी पैसे न दिल्याने मित्राला थेट…

शुल्लक कारणावरून एका इसमाने त्याच्याच मित्राचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडल्याचे उघडकीस आले आहे. चिकनची पार्टी करणं तरूणाच्या जीवावर बेतलं. पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचा भयानक प्रकार खारघर मध्ये घडला.

चिकनची पार्टी जीवावर बेतली, पार्टीसाठी पैसे न दिल्याने मित्राला थेट...
क्राईम न्यूजImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 10:56 AM

मुंबई, नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गुन्हे घडत असून शुल्लक कारणावरून एका इसमाने त्याच्याच मित्राचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडल्याचे उघडकीस आले आहे. चिकनची पार्टी करणं तरूणाच्या जीवावर बेतलं. पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचा भयानक प्रकार खारघर मध्ये घडला आहे. जयेश वाघे असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मन्नू दिनेश शर्मा याला अटक केली असून त्याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता. 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास आदिवासी वाडी, बेलपाडा, खारघर येथे क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते. मात्र मन्नू यांच्याकडून चिकन साठी कोणतीही वर्गणी येत नाही, पैसे मिळाले नाहीत याच रारणावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला आणि शिवीगाळ करण्यात आली. पाहता पहात ते भांडण वाढलं. जयेशने मन्नू याच्या कानाखाली मारली. त्यामुळे मन्नू हा प्रचंड संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने जयेशला हाताबुकयांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली. एवढंच नव्हेतर क्रिकेटच्या लाकडी बॅटने जयेशच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केले.

या मारहाणीमुळे जयेश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्येच त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यावर खारघर पोलिस तेथे दाखल झाले. आरोपी मन्नू विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली. याप्रकरणी अधित तपास सुरू आ

पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’
पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’.
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी.
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर.
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध.
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा.
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल.
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ.
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?.
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार.
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं.