शिक्षक आहे का हैवान? वही हरवल्याने तिसरीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची वही हरवल्याबद्दल बेदम मारहाण केली. यामुळे विद्यार्थ्याच्या पाठीवर वळ उठले आहेत. पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करत शिक्षकावर कारवाईची मागणी केली जात आहे.
शाळेतील शिक्षकांवर पालकांचा खूप विश्वास असतो, त्यामुळेच ते निर्धास्तपणे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत असतात. आपली मुलं सुरक्षित राहतील, शिक्षकांकडून त्यांना चांगल्या गोष्टी शिकायाल मिळतील असा विश्वासही पालकांना असतो. पण नाशिकमधअये एका शिक्षकाने जे केलं ते पाहून कोणाचाही शिक्षक या व्यक्तीवरूनच विश्वास उडेल, त्या विश्वासाला तडा जाईल. नाशिकमध्ये एका शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अनानुष मारहाण केली आहे. आणि त्यातचं कारण तर अतिशय शुल्लक आहे. वही हरवली म्हणून त्या विद्यार्थ्याला बेदम चोप देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथील जिल्हा परिषद शाळेत हा भयानक प्रकार घडला आहे. केवळ वही हरवली म्हणून तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत आयुष सदगीर हा मुलगा तिसरीत शिकतो. मात्र आशिषने होमवर्क केला नाही, तसेच त्याची वही हरवली असे त्याने शिक्षकांना सांगितल्यानंतर त्या शिक्षकांनी त्याला छडीने मारहाण केली. यामुळे त्याच्या पाठीवर बरेच वळही उठले.
यामुळे संतापाचे वातवरण असून त्या मुलाच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. शुल्लक कारणांवरन विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
वरच्या वर्गात बसला म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
जिल्हा परिषदेच्या शाळेत एका विद्यार्थ्याला केवळ वरच्या वर्गात का बसला म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सातवीच्या एका विद्यार्थ्याला नववीच्या वर्गात बसला म्हणून मुख्याध्यापकाने लिंबाच्या काठीने झोडपल्याची घटना घडली. या शाळेतील या विद्यार्थ्यांच्या मांडीवर आणि पायावर काठीचे वळ उठले असून सूज आल्याने त्याची प्रकृती बिघडली. या प्रकरणात मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी मुलाच्या पालकांनी केली होती.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली होती. नववीच्या वर्गात का बसला असे म्हणत मुख्याध्यापकाने या विद्यार्थ्याच्या पायावर आणि मांडीवर अमानुषपणे मारहाण केल्याचे उघड झाले. हा विद्यार्थी 14 वर्षांचा आहे. या अल्पवयीन मुलाच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी मुख्याध्यापक खेडकर यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.