Nalasopara Kindapping : नालासोपारा रेल्वे स्थानकातून चिमुकल्याचे अपहरण; सीसीटीव्हीच्या आधारे मुलाची सुखरुप सुटका
नालासोपारा रेल्वे स्थानकातून काल दुपारी सव्वा 12 च्या सुमारास साडे तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मुलाच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध करून ही मुलगा मिळाला नसल्याने रात्री उशिरा वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
नालासोपारा : नालासोपारा रेल्वे स्थानकातून अपहरण (Kidnapping) झालेल्या साडेतीन वर्षाच्या मुलासह, मुलाला घेऊन जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी सुरू केली आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकातून काल गुरुवारी दुपारी सव्वा 12 च्या सुमारास चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. अपहरण झालेला मुलाला एक अज्ञात महिला हाताला धरून सोबत घेऊन जाताना नालासोपारा रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याबाबत वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. आज तुळिंज पोलिसांनी नालासोपारा पूर्व विजयनगर परिसरातून महिलेला ताब्यात घेऊन मुलाची सुखरुप सुटका (Rescued) केली. त्यानंतर दोघांनाही रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तुळिंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी ही माहिती दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत मुलाची सुटका केली
नालासोपारा रेल्वे स्थानकातून काल दुपारी सव्वा 12 च्या सुमारास साडे तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मुलाच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध करून ही मुलगा मिळाला नसल्याने रात्री उशिरा वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता एक महिला मुलाचा हात धरून घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. वसई रेल्वे लोहमार्ग पोलीस आणि तुळिंज पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला. ही महिला नालासोपारा पूर्व विजय नगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच तुळिंज पोलिसांनी त्या परिसरात जाऊन महिलेच्या घरातून अपहरण झालेला मुलगा आणि महिलेला ताब्यात घेऊन रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांकडून आरोपी महिलेची चौकशी सुरु
रेल्वे पोलीस या महिलेचा कसून तपास करीत असून, या मुलाचे अपहरण केले की मुलगा रेल्वे प्लॅटफॉर्मवर एकटा असल्यामुळे या मुलाला महिला घेऊन गेली, हे मात्र पोलीस तपासानंतर उघड होईल. मात्र एखादा मुलगा जर एकटा दिसला असेल तर त्याला ताब्यात घेऊन कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देणे गरजेचे असताना ही महिला मुलाच्या हाताला धरून घेऊन गेली कशी यावरून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेला मुलगा सुखरूप मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. (Child kidnapped from Nalasopara railway station rescued safely on the basis of CCTV)