धक्कादायक! मुंबईत नवजात बाळांची विक्री करणाऱ्यात डॉक्टर, नर्सही!

मुंबईत नवजात बालकांची विक्री करण्याऱ्या टोळीला मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळांची विक्री करणाऱ्यात डॉक्टर, नर्सही!
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 10:37 AM

मुंबई : मुंबईत नवजात बालकांची विक्री करण्याऱ्या टोळीला मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या टीमने ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये चक्क डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन यांचा देखील समावेश आहे. गरिबीमुळे लहान मुलं विकत असल्याचे या तपासात उघडकिस आले आहे (Child trafficking gang arrested by Mumbai crime branch unit 1).

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून लहान मुले गायब होण्याच्या घटना देखील वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी या गुन्हेगारांच्या शोधात होते. सदर टोळी लहान मुलांची, नवजात बालकांची खरेदी-विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.

नवजात बालकांची खरेदी-विक्री सुरु असल्याची कुणकुण

मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांना मुंबईत लहान मुलांची खरेदी विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपास सुरू केला होता. वांद्रे खेरवाडी येथील ज्ञानेश्वर नगरातील महिलांनी आपली मुलं एजंट मार्फत विकल्याच समजताच त्या महिलांना पोलिसानी ताब्यात घेतलं. त्यानंतर ज्या एजंटनी ही मुलं विकली आहेत, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

तपासाची चक्र फिरत असतानाच, पुढील तपासात लहान मुलं विकणारी टोळीच उघडकीस आली. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या टोळीत एक डॉक्टर, एक नर्स, एक लॅब टेक्निशियन आणि सहा एजंट्सचा समावेश होता. या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे (Child trafficking gang arrested by Mumbai crime branch unit 1).

टोळीमध्ये सर्वाधिक महिला एजंट

या टोळीतील सहा एजंटमध्ये पाच महिला आहेत. हे रॅकेट ज्या महिलांना मुलं होणार आहे, मात्र त्या मुलाचं पालन पोषण करण्यास महिला सक्षम नाहीत, अशा महिलांचा शोध घ्यायच्या. त्यांनी बाळाला जन्म दिला की, या नवजात मुलांची खरेदी विक्री व्हायची. आतापर्यंत या टोळीने तीन मुलांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार केला असून, तो पोलीस तपासात उघडकीस आला आहे.

पैशांसाठी मुलांची विक्री

अडीच ते साडे तीन लाख रुपयांना मुलं विकली जात होती. गरिबी आणि पैशांची चणचण या कारणांमुळे या नवजात बालकांची खरेदी-विक्री सुरु होती. अटक करण्यात आलेल्या टोळीने मोठ्या प्रमाणात लहान मुलांची विक्री केली असल्याची शक्यता, तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

(Child trafficking gang arrested by Mumbai crime branch unit 1)

हेही वाचा :

उल्हासनगरमधील धक्कादायक घटना, लग्नाच्या वरातीत चाकू हल्ला

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.