अश्लील व्हिडीओ दाखवून केलेल्या बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ यांनी केली मोठी मागणी, म्हणाल्या…
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिकमधील कथित आधारश्रम येथील अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याच्या मुद्द्यावरून सुरक्षेच्या मुद्द्याला हात घातला आहे.
नाशिक : नाशिकमधील आश्रम शाळेतील बलात्कार प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात असलेल्या द किंग फाउंडेशन संचलित आधाराश्रमात चौदा वर्षाच्या शाळकरी मुलीवर संचालकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अश्लील व्हिडिओ दाखवून आधारश्रम संचालक हर्षल मोर याने हे कृत्य केले आहे. पीडित अल्पवयीन मुलीने याबाबत आई-वडिलांना ही बाब सांगितल्यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. त्यावरून पॉस्को आणि अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी हर्षल मोरे याला अटक करण्यात आली असून यानंतर आधारश्रमाच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला होता. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठी मागणी केली आहे. ही मागणी मान्य होईल असेही त्यांनी म्हंटले असून त्याबाबतचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिकमधील कथित आधारश्रम येथील अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याच्या मुद्द्यावरून सुरक्षेच्या मुद्द्याला हात घातला आहे.
चित्रा वाघ यांनी राज्यातील सर्व आधारश्रमांचे ऑडिट होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आधारश्रमाच्या परवानगी वरुण नेहमी प्रश्न उपस्थित केले जात असतांना चित्रा वाघ यांची मागणी महत्वाची मानली जात आहे.
नाशिकमधील आधारतीर्थ येथे एका बालकाच्या मृत्यूवरुन आधारतीर्थ आश्रमाच्या परवानगीविनाच आश्रम सुरू असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे, राजकीय वरदहस्त असल्याने आश्रम सुरू असल्याची चर्चा आहे.
नाशिक म्हसरूळ द किंग फाउंडेशन ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमात संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीये..गुन्हा दाखल झालाय आरोपीच्याही मुसक्या @nashikpolice नी आवळल्या आहेत दिपाली खन्ना महिला पोलिस अधिकारी अधिक तपास करताहेत…(१/२) pic.twitter.com/Q2jYCS7jzF
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 25, 2022
ही घटना ताजी असतांना म्हसरूळ परिसरातील माने नगर परिसरात अल्पवयीन मुलीवर आधारश्रमात बलात्कार झाल्याची घटना समोर आल्याने परवानगीचा आणि सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.
कथित द किंग फाउण्डेशन नावाच्या संस्थेकडून चालविले जाणारे ज्ञानदिप गुरुकुल आधाराश्रमाचा संचालक हर्षल मोरे याला अटक करण्यात आली असून कारवाईची मागणी केली जात आहे.