आणखी एक श्रद्धा वालकर ? नेमकं चाललंय काय ? फ्लायओव्हरजवळ मुलीच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने राजधानी हादरली…

गीता कॉलनी फ्लायओव्हरजवळ बुधवारी सकाळी एका मुलीच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

आणखी एक श्रद्धा वालकर ? नेमकं चाललंय काय ?  फ्लायओव्हरजवळ मुलीच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने राजधानी हादरली...
कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 1:15 PM

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder) हिची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याच्या खळबळजनक घटनेची पुन्हा आठवण करून देणारे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बुधवारी सकाळी फ्लायओव्हरजवळ एका मृतदेहाचे तुकडे (chopped body parts of woman) सापडल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.

बुधवारी गीता कॉलनीजवळील फ्लायओव्हरजवळ एक मृतदेह सापडला. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता मृतदेहाचे तुकडे करून तो टाकून दिल्याचे आढळले. आजूबाजूच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिस हा मृतदेह नेमका कोणाचा आणि तो कोणी आणून टाकला, त्या आरोपीचा शोध घेत आहेत.

यासाठी पोलीस पथक ऑर्थो फॉरेन्सिक टीमची मदत घेत आहे. त्यांच्या मदतीने मृतदेहाचे हे तुकडे स्त्रीचे आहेत की पुरुषाचे आहेत हे निश्चित करता येईल, परंतु प्रथमदर्शनी मृतदेहाचे हे तुकडे महिलेचे असल्याचे दिसत आहे. तीन जिल्ह्यांचे पोलिस आणि अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून 7 ते 8 मृतदेहाचे तुकडे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

श्रद्धा हत्याकांडाच्या आठवणी ताज्या

या केसमुळे पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे. गेल्या वर्षी आफताब या श्रद्धाच्या लिव्ह इन पार्टनरने तिचा गळा दाबून खून केला होता. तिच्या हत्येनंतर त्याने मृतदेहाचे ३५ हून अधिक तुकडे केले होते. मृतदेहाचे तुकडे कोणालाच सापडू नयेत यासाठी आफताबने ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते.

साहिलने चाकूचे अनेक वार करून केला होता साक्षीचा खून

तर दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात दीड महिन्यापूर्वी एका माथेफिरू प्रियकराने अल्पवयीन साक्षीवर चाकूने अनेक वार करून तिची हत्या केली होती. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामध्ये आरोपीने साक्षीवर निर्घृणपणे कसे वार केले, हे स्पष्टपणे दिसत होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.