गंडा घालण्याचा नवा फंडा? जेष्ठ नागरिकाची 95 हजारांची फसवणूक, आजोबा कुठे चुकले ?
नाशिकमध्ये एका वृद्ध व्यक्तीला ऑनलाइन पद्धतीने 95 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
नाशिक : अलिकडच्या काळात फोनद्वारे विश्वास संपादन करून ऑनलाइन फसवणूकीचे ( Online Fraud ) प्रकार वारंवार घडत असल्याचे समोर आलेले असतांना नाशिकमध्ये पोलिस ( Nashik Police ) ठाण्यात एक तक्रार दाखल झाल्यानंतर फसवणूक झल्याचे समोर आले आहे. मुंबई नका पोलिस ठाण्यात एका वृद्ध व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरुण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 95 हजार रुपयांना यावेळी गंडा घालण्यात आला आहे. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीचा नवा फंडा यानिमित्ताने समोर आला आहे.
नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात राहणारे 63 वर्षीय नवलचंद मदनलाल जैन यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सायबर गुन्ह्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इंडिया फस्ट लाईफ इन्शुरन्स या कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून जैन यांना तीन ते चार दिवस सलग कॉल केले. जैन यांचा समोरील व्यक्तीने विश्वास संपादन केल्याचे यामध्ये दिसून येत आहे.
जैन यांना समोरील व्यक्तीने एकप्रकारे आमिष दाखविले होते. विमा पॉलिसीचे दोन हप्ते भरल्यास तुम्हाला संपूर्ण रक्कम काढता येईल असे सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून जैन यांनी तीन वेळेला मुंबईतील बँकेत पैसे पाठविले.
जैन यांनी आडीएफसी बँकेच्या मुंबईतील लोअर परेल शाखेत 30 हजार, 35 हजार आणि नंतर 30 हजार असे रुपयांचा ऑनलाइन भरणा केला आहोत. त्यानंतर त्यांनी संपूर्ण रक्कम काढण्यासाठी गेले असतांना बँकेत पैसे नसल्याची बाब समोर आली.
जैन यांना आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीच्या मोबाइलवर संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला आहे.