Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुटबॉल सामन्यादरम्यान दोन टीममध्ये फ्री स्टाईल, सतेज चषक स्पर्धेदरम्यान घडला प्रकार

कोल्हापुरातील शाहू स्टेडिअमवर बुधवारी दुपारी सतेज फुटबॉल सामना सुरु होता. यावेळी बीजीएम स्पोर्टसने 2-1 अशी आघाडी मिळवली होती. मात्र सामना संपण्यास काही वेळ शिल्लक असतानाच दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

फुटबॉल सामन्यादरम्यान दोन टीममध्ये फ्री स्टाईल, सतेज चषक स्पर्धेदरम्यान घडला प्रकार
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडू भिडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 1:13 PM

कोल्हापूर / भूषण पाटील : फुटबॉल सामन्यादरम्यानच खेळाडूंच्या दोन संघात मैदानातच फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना कोल्हापुरात बुधवारी घडली. बिजिएम स्पोर्ट्स आणि झुंजार क्लबच्या सामन्यात खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावले. छत्रपती राजश्री शाहू स्टेडियमवर सतेज चषक स्पर्धा सुरू असताना हा प्रकार घडला. यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट लागले आहे. या घटनेमुळे मैदानावर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी दोन्ही संघातील चार खेळाडूंवर रेड कार्ड दाखवून बाहेर काढण्यात आले. तर खेळाडू आणि समर्थकांसह एकूण 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

शाहू स्टेडिअमवर सामना सुरु असताना घडला प्रकार

कोल्हापुरातील शाहू स्टेडिअमवर बुधवारी दुपारी सतेज फुटबॉल सामना सुरु होता. यावेळी बीजीएम स्पोर्टसने 2-1 अशी आघाडी मिळवली होती. मात्र सामना संपण्यास काही वेळ शिल्लक असतानाच दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. काही क्षणात मैदानाला आखाड्याचे स्वरुप प्राप्त झाले. वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही संघातील राखीव खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून आल्याने वाद आणखी वाढला.

दोन्ही संघातील चार खेळाडूंना रेड कार्ड दाखवून बाहेर काढले

अखेर संयोजकांनी मैदानावर दाखल होत वाद मिटवला. यानंतर दोन्ही संघातील चार खेळाडूंना रेड कार्ड दाखवत मैदानाबाहेर काढले. झुंजार क्लबमधील सूर्यप्रकाश सासने, अवधूत पाटोळे आणि बीजीएम स्पोर्ट्समधील अभिजीत साळोखे, महेश जामदार यांना रेड कार्ड दाखवून बाहेर काढण्यात आले.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.