पोलीस ठाण्यातच दोन तक्रारदार भिडले, एकाच्या गळ्यावर ब्लेडने वार

दोन कुटुंबात काही कारणावरुन वाद झाला. मग या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. यानंतर हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी दोन्ही तक्रारदारांना शेजारी बसवले होते.

पोलीस ठाण्यातच दोन तक्रारदार भिडले, एकाच्या गळ्यावर ब्लेडने वार
पोलीस ठाण्यातच एकावर ब्लेड हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 10:55 AM

पुणे : तक्रार देण्यासाठी गेलेल्या दोन तक्रारदारांमध्ये पोलीस ठाण्यातच वाद झाला. या वादातून एकाने दुसऱ्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली. क्षितिज बाबाजी धाडगे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर वैभव बोऱ्हाडे असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी जखमीला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पोलीस ठाण्यातच ब्लेडने वार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

दोन कुटुंबात हाणामारी झाली होती

खेड तालुक्यातील दोंदे येथे दोन कुटुंबामध्ये वाद होऊन हाणामारीची घटना घडली होती. यावेळी वैभव बोऱ्हाडे याच्या पत्नीला मारहाण झाल्याने तक्रार देण्यासाठी खेड पोलीस ठाण्यात आला होता. दरम्यान क्षितिज दांडगे हा देखील तक्रार देण्यासाठी आला होता. पोलिसांनी दोघा तक्रारदारांना एकत्र बसवून ठेवले होते. दरम्यान झालेल्या प्रकरणावरून दोघांमध्ये पुन्हा पोलीस ठाण्यात बाचाबाची झाली.

पोलीस ठाण्यात एकावर ब्लेडने हल्ला

यावेळी राग अनावर होऊन वैभव बोऱ्हाडे याने खिशातील ब्लेड काढून क्षितिज याच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात क्षितिज गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तत्काळ जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.