Gondia Crime : जुना वादातून शेजाऱ्यांमध्ये जुंपली, परस्परविरोधी गुन्हे दाखल

एक वर्षापूर्वी घडलेल्या घटनेतन दोन कुटुंबात वाद झाला. हळूहळू हा वाद वाढत गेला, मग पुढे जे घडलं ते भयंकर होतं.

Gondia Crime : जुना वादातून शेजाऱ्यांमध्ये जुंपली, परस्परविरोधी गुन्हे दाखल
जुन्या वादातून दोन कुटुंबात हाणामारीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 7:40 PM

गोंदिया / 29 जुलै 2023 : जुना वाद उफाळून आल्याने शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात घडली आहे. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी देवरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विजय पटले, रवींद्र पटले, विनोद वट्टी, शेवंताबाई छत्राम आणि वट्टी यांचा मुलगा यांचा जखमींमध्ये समावेश आहे. देवरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

देवरी तालुक्यातील ग्राम कान्हाडगाव कुटुंबीय शेजारी शेजारी राहतात. पटले परिवारातील मुलाचा एक वर्षापूर्वी तलावात बुडून मृत्यू झाला होता. मात्र आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला नसून, वट्टी कुटुंबाने त्याची हत्या केली, असा संशय पटले कुटुंबाला होता. यातूनच ही घटना घडली. विनोद वट्टी यांचा मुलगा घरी जात असताना पटले परिवारातील वयोवृद्ध महिला शेवंताबाई छत्राम हिने त्याला शिवीगाळ केली. यातून दोन्ही कुटुंबात भांडण झाले.

भांडणाचे पर्यावसन हाणारीत झाले. दोन्ही कुटुंब लाठ्या-काठ्या घेऊन एकमेकांवर तुटून पडले. या हाणामारीत पटले परिवारातील विजय पटले, रवींद्र पटले, वट्टी परिवारातील दोन जण आणि वयोवृद्ध महिला जखमी झाले. ही हाणामारीची घटना बघ्यांनी मोबाईलमध्ये कैद केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल होताच देवरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले. घटनेचा तपास देवरी पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.