पुण्यात पुन्हा कोयता हल्ला, दोन टोळ्या एकमेकांना भिडल्या; घटना सीसीटीव्हीत कैद

हडपसर पोलिसांनी दोन्ही टोळीतील गुन्हेगारांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले होते. यावेळी दोन्ही टोळ्यांतील गुन्हेगारांचे साथीदारही रुग्णालयात हजर होते. यावेळी त्यांच्यात ही हाणामारी झाली.

पुण्यात पुन्हा कोयता हल्ला, दोन टोळ्या एकमेकांना भिडल्या; घटना सीसीटीव्हीत कैद
रुग्णालयात दोन टोळ्या एकमेकांना भिडल्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 10:21 AM

पुणे / अभिजीत पोते : दोन टोळ्यांमध्ये झालेल्या कोयता हल्ल्यात तीन जण जखमी झाल्याची घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. ससून रुग्णालयाच्या आवारातच शुक्रवारी ही घटना घडली. रुग्णालयाबाहेरच झालेल्या या घटनेमुळे रुग्ण आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हडपसर पोलिसांनी दोन्ही टोळीतील गुन्हेगारांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले होते. यावेळी दोन्ही टोळ्यांतील गुन्हेगारांचे साथीदारही रुग्णालयात हजर होते. यावेळी त्यांच्यात ही हाणामारी झाली. हडपसर पोलिसांनी दोन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांना अटक केली आहे.

गुंडांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले असता घडली घटना

हडपसर येथील रामटेकडी परिसरातील दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला होता. हडपसर पोलिसांनी या दोन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांवर कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण उपचार कक्षाबाहेर दोन टोळ्यांमधील गुन्हेगार समोरासमोर आले. त्यावेळी गुन्हेगारांसोबत असलेल्या त्यांचे साथीदार एकमेकांशी भिडले.

दोन्ही टोळीकडून एकमेकांवर कोयता हल्ला

गुन्हेगारांनी शिवीगाळ करीत एकमेकांवर कोयत्याने वार केले. त्यात तिघेजण जखमी झाले आहेत. ससून रुग्णालयाचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हेगार ऐकतच नव्हते. सर्व घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी दोन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

कांदिवलीत क्षुल्लक कारणातून महाविद्यालयी विद्यार्थी भिडले

बसण्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून महाविद्यालयीन तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना ठाकूर महाविद्यालयात घडली. या मारहाणीत चार जण जखमी झाले. याप्रकरणी एका विद्यार्थ्याला अटक केली असून, अन्य दोघे जण फरार आहेत. फरार विद्यार्थ्याचा समतानगर पोलीस शोध घेत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.