फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, घटना सीसीटिव्हीत कैद

होळीच्या दिवशी फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, घटना सीसीटिव्हीत कैद
फुगा मारल्याच्या रागातून डोंबिवलीत दोन गटात राडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 9:14 AM

डोंबिवली / सुनील जाधव : राज्यात होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र या होळीच्या उत्साहाला गालबोट लावणारी घटना डोंबिवलीत घडली आहे. होळीच्या दिवशी होळी पेटवून सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, डोंबिवली आजदे पाडा परिसरात अतिउत्साही तरुणांमुळे रंगाचा बेरंग झाल्याचे पाहायला मिळालं. फुगा मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

एका गटातील तरुणाने दुसऱ्या गटावर मुद्दाम फुगा मारला

डोंबिवली आजदेपाडा परिसरात काल रात्रीच्या सुमारास एका गटातील तरुणावर दुसऱ्या गटातील तरुणाने मुद्दाम फुगा फेकल्याने दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांना बेदम मारहाण सुरू केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या दिवशी परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.

नाशिकमध्ये मद्यपींचा धिंगाणा

नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात काही मद्यपी युवकांची सिनेस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक या अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या परिसरात ही घटना घडली आहे. भररस्त्यात काही मद्यपी युवकांनी हाणामारी केल्याची घटना घडली.

हे सुद्धा वाचा

युवकांनी एका तरुणाला टार्गेट करून, त्याच्या अंगावरील शर्ट फाडून, त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा परिसर वर्दळीचे ठिकाण असल्याने घटनास्थळी बघणाऱ्यांची देखील मोठी गर्दी जमली होती. या परिसरात पोलिसांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने मोठ्या प्रमाणात तथाकथितत दादा तसेच गावगुंडांकडून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे प्रयत्न होत आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.