Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेत बॉम्बस्फोट करण्याची धमकी, पोलीस तपासात जे निष्पन्न झाले ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली

अखेर तीन तास तपास केल्यानंतर या धमकी प्रकरणाचा सोक्षमोक्ष करण्यास पोलिसांना यश आले. ही धमकी दुसरे तिसरे कुणीही नसून चक्क शाळेतील विद्यार्थ्यांनीच दिल्याचे निष्पन्न झाले.

शाळेत बॉम्बस्फोट करण्याची धमकी, पोलीस तपासात जे निष्पन्न झाले ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली
पंजाबमध्ये शाळा उडवण्याची धमकी
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 7:30 PM

पंजाब : आजकालच्या विद्यार्थ्यांचा काही नेम नाही. कधी काय करतील हे सांगता येत नाही. यामुळे पालकांचीच नाही तर शिक्षकांचीही डोकेदुखी वाढली आहे. पंजाबमध्ये गणिताचा पेपर (Maths Paper) टाळण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी जे केले ते कळल्यानंतर शिक्षकांसह पोलीसही चक्रावून गेले. दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी शाळा बॉम्ब (Bomb)ने उडवून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी एका विद्यार्थ्याच्या वडिलांना अटक (Arrest) केले आहे.

अमृतसरमधील स्प्रिंग डेल स्कूल उडवण्याची धमकी

पंजाबमधील अमृतसर येथील डीएव्ही शाळेनंतर स्प्रिंग डेल स्कूल उडवण्याच्या धमक्या मिळाल्याने एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने कारवाईला सुरवात केली.

पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड

अखेर तीन तास तपास केल्यानंतर या धमकी प्रकरणाचा सोक्षमोक्ष करण्यास पोलिसांना यश आले. ही धमकी दुसरे तिसरे कुणीही नसून चक्क शाळेतील विद्यार्थ्यांनीच दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांची ओळख पटवली आहे.

हे सुद्धा वाचा

गणिताची परीक्षा टाळण्यासाठी परसवली अफवा

गणिताची परीक्षा टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ही अफवा पसरवली होती. हा धमकीचा संदेश इंग्रजी आणि उर्दूमध्ये लिहिला होता. यात 16 सप्टेंबर रोजी शाळेत वृक्षारोपण मोहीम आहे. या दिवशी बॉम्बस्फोट होणार. शक्य असेल वाचण्याचा प्रयत्न करा, असे लिहिले होते.

या मॅसेजनंतर शाळेने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे सायबर सेलही सक्रिय झाले. अवघ्या तीन तासांत या गैरप्रकारातील गुन्हेगारांचा छडा लागला आहे.

काही दिवसांपूर्वी डीएव्ही शाळा उडवण्याची मिळाली होती धमकी

काही दिवसांपूर्वी अमृतसरची डीएव्ही शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेसेज व्हायरल झाला होता. शाळेच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी खोडसाळपणे हा मेसेज पालकांना पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

याप्रकरणी डीसीपी मुखविंदर सिंह यांनी सांगितले की, शाळेतील दहावीच्या दोन विद्यार्थ्यांची नावे आली आहेत. अल्पवयीन असल्याने त्यांचे नाव आणि ओळख उघड केली जात नाही.

ज्या सिमवरुन मॅसेज आला होता त्या पालकांना अटक

मात्र पोलिसांनी एकाच्या वडिलांना अटक केली आहे. त्यांच्या नावावर एक सिम होता आणि या सिमवरुन मॅसेज व्हायरल झाला होता. अन्य विद्यार्थ्याच्या वडिलांची भूमिकाही तपासण्यात येत आहे.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.