सकाळी शाळेत गेलेला मुलगा घरी परतलाच नाही, मग पित्याला व्हॉट्सअपवर एक मॅसेज आला अन्…

नववीत शिकणाऱ्या मुलाने वडिलांकडे आयफोन मागितला. वडिलांनी आयफोन खरेदी करण्यास असमर्थता दर्शवली. मग मुलाने वडिलांना अद्दल घडवण्यासाठी धक्कादायक पाऊल उचलले.

सकाळी शाळेत गेलेला मुलगा घरी परतलाच नाही, मग पित्याला व्हॉट्सअपवर एक मॅसेज आला अन्...
मानखुर्दमधील बेपत्ता चिमुकलीची सुटकाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 3:31 PM

सीतापूर : उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल फोनने मुलांना अक्षरशः वेड लावले आहे. मोबाईलसाठी मुलं कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. याचेच प्रत्यत सीतापूरमध्ये आले आहे. आयफोन पाहिजे म्हणून मुलाने वडिलांकडे हट्ट केला. वडिलांनी आयफोन घेऊन देण्यास असमर्थता दाखवल्यानंतर मुलाने थेट स्वतःच्या अपहरणाचाच बनाव केला. पोलिसांनी अपहरणाचा तपास सुरु केला असता हे धक्कादायक सत्य समोर आल्यानंतर वडिलांसह पोलीसही चक्रावून गेले.

वडिलांकडे आयफोन मागत होता

सीतापूरमध्ये नववीत शिकणाऱ्या मुलाने वडिलांकडे आयफोनची मागणी केली होती. मात्र वडिल एक छोटेसे कपड्यांचे दुकान चालवत असल्याने त्यांनी आयफोन घेण्यास असमर्थता दर्शवली. यानंतर मुलाने हे पाऊल उचलले आणि खंडणीच्या पैशातून आयफोन विकत घेण्यासाठी अपहरणाचे नाटक केले.

आयफोनसाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला

मुलगा गावातील सरकारी शाळेत शिकतो. मुलगा शाळेतून घरी आला नाही म्हणून वडिलांनी शोधाशोध सुरु केली. मग मित्राच्या फोनवरून व्हॉट्सअॅपवर खंडणीसाठी फोन करून मुलाने वडिलांकडे पाच लाख रुपये मागितले. यानंतर वडिलांनी पोलिसात धाव घेत सदर फोनबाबत सांगितले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

हे सुद्धा वाचा

अपहरणाची घटना उघड होताच सर्वांनाच धक्का बसला

जिल्हा पोलीस, सायबर आणि एसओजी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यानंतर रात्री पोलिसांनी खंडणीसाठी वापरलेल्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. यानंतर ज्याच्या नावावर हा नंबर होता त्या चपलांच्या दुकानाच्या मालकाची चौकशी केली असता, हा फोन त्याचा मुलगा वापरत असल्याचे कळले. यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पाहिले असता मुलगा तेथे आढळला.

यानंतर मुलाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला. समुपदेशनानंतर मुलाला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. घटना उघड होताच मुलाच्या वडिलांसह पोलीसही चक्रावून गेले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.