ट्विट करताना काळजी घ्या! एक ट्विट आलं अंगाशी, पोलिस थेट घरीच घ्यायला आले, नेमकं काय घडलं?

बारावीच्या विद्यार्थ्याने एक ट्विट केले. पण हे ट्विट त्याला चांगलेच महागात पडले. हे ट्विट पाहून मुंबई पोलीस थेट दारात हजर झाले आणि विद्यार्थ्याला अटक केली.

ट्विट करताना काळजी घ्या! एक ट्विट आलं अंगाशी, पोलिस थेट घरीच घ्यायला आले, नेमकं काय घडलं?
विमानाविषयी 'ते' ट्विट महागात पडले !Image Credit source: airplane
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 3:00 PM

मुंबई : हल्लीची पिढी सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. पण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्याच्या नादात मुलं काय करतील याचा नेम नाही. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका बारावीच्या विद्यार्थ्याने चक्क विमान पडणार असल्याचे ट्विट केले. मग एकच खळबळ उडाली. यानंतर विमान कंपनीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सदर विद्यार्थ्याला अटक केले. मात्र त्याची परीक्षा सुरु असल्याने त्याला जामिनावर सोडण्यात आले. ट्विट करणे विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे ट्विट करताना तुम्हीही काळजी घ्या, अन्यथा एक ट्विट तुम्हालाही पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन जाईल.

काय लिहिले होते ट्विटमध्ये?

विद्यार्थ्याने ट्विट करत म्हटले होते की, “आकासा एअर बोईंग 737 मॅक्स (विमान) क्रॅश होईल.” या ट्विटनंतर आकासा एअरलाइनने मुंबई पोलिसात विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या ट्विट संदर्भात तपास सुरू केला असता, हे ट्विट गुजरातमधील एका बारावीच्या विद्यार्थ्याने केल्याचे आढळून आले.

मुंबई पोलिसांनी गुजरातमधून विद्यार्थ्याला केली अटक

यानंतर मुंबई पोलिसांनी गुजरात गाठून 27 मार्चला विद्यार्थ्याला अटक केली. विद्यार्थ्याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, आपल्याला विमानांबद्दल जाणून घेण्यात रस आहे आणि सोशल मीडियावर अशा पोस्टचे परिणाम काय आहेत याची आपल्याला माहिती नव्हती. गोंधळ निर्माण करण्याचा आपला हेतू नव्हता. यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्याला एक दिवस ताब्यात ठेवल्यानंतर परीक्षा असल्याने पाच हजार रुपये जामिनावर त्याची सुटका केली.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.