Mumbai Airhostess Murder : तरुण एअर होस्टेसची मुंबईत हत्या, तो पळून जाणार होताच… पण सीसीटीव्हीने… सीसीटीव्हीत नेमकं काय दिसलं ?

मुंबईतील एअर होस्टेसच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याच इमारतीतील सफाई कर्मचाऱ्याला अटक केली आहे. 45 लोकांची चौकशी केल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज कसून तपासल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Mumbai Airhostess Murder : तरुण एअर होस्टेसची मुंबईत हत्या, तो पळून जाणार होताच... पण सीसीटीव्हीने... सीसीटीव्हीत नेमकं काय दिसलं ?
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 3:29 PM

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : अंधेरीतील एका इमारतीत राहणारी फ्लाइट अटेंडंट रुपल ओगरे (air hostess murder) हिची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सफाई कर्मचारी विक्रम अठवाल याला अटक केली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत कसून तपास केला. त्यांनी 45 लोकांची चौकशी केली आणि इमारतीत असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज (cctv footage) तपासल्यानंतर आरोपीला अटक केली. रुपलच्या हत्येनंतर विक्रमने त्याचा युनिफॉर्म धुतला आणि दुसरे कपडे घालून तो बिल्डींग बाहेर जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. त्यामुळेच त्याच्यावरचा संशय वाढल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन मुलांचा पिता असलेल्या विक्रम याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे बिल्डींगमधील लोकांनी सांगितले. विक्रमची पत्नीदेखील याच इमारतीमध्ये लोकांच्या घरी काम करते. मृत तरूणी रूपल ही तिच्या बहीणीसह या इमारतीतील फ्लॅटमध्ये रहायची. त्याच फ्लॅटमध्ये रविवारी तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होता. तिच्या बहीणीची मैत्रिण त्यांच्या फ्लॅटवर पोहोचल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. बराच वेळ बेल वाजवूनही कोणीच दार उघडले नाही, कोणीच फोनही उचलत नव्हते. अखेर तिने डुप्लीकेट चावी बनवून घेतली आणि घराचा मुख्य दरवाजा उघडला.

बाथरूममध्ये मृतावस्थेत सापडली रुपल

मात्र दार उघडून आत येताच समोर जे दृश्य दिसलं ते पाहून सर्वच हादरले. बाथरूममध्ये रुपलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि तिच्या मानेवर चाकूमुळे झालेल्या मोठ्या जखमाही दिसत होत्या. मरोळ-मिलिटरी रोडवरील एनजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या फ्लॅटमध्ये रुपलचा मृतदेह सापडल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आणि 12 तासांच्या आतच आरोपीला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी विक्रम हा त्याच इमारतीत सफाई कर्मचारी म्हणून काम करत.त्याच्या हातालाही दुखापत झाल्याचे दिसून आले.

हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध सुरू

याप्रकरणी पोलिसांनी बिल्डींगमधील हाऊसकिपींग स्टाफ आणि सुरक्षा रक्षक यांच्यासह 45 हून अधिक लोकांची चौकशी केली. त्यानंतर पवई पोलिसांनी सफाई कर्मचारी असलेल्या विक्रमला अटक केली. तो (रविवारी) त्या दिवशी बिल्डींगमध्ये आला तेव्हा त्याच्या अंगावर वेगळे कपडे होते, मात्र बिल्डींगमधून बाहेर पडताना त्याने दुसरचे कपडे घातल्याचे सीसीटीव्ही मधून दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता, विक्रमने त्याचा गुन्हा कबूल केला.

गुन्ह्याच्या दोन दिवस आधीच, शुक्रवारी आरोपी विक्रमचा पीडित तरूणी रुपल ओगरे हिच्याशी वाद झाला होता. त्याने सफाईचे काम नीट न केल्याने रुपल त्याच्यावर ओरडली होती. यामुळे तो चिडला होता. तिच्यावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने विक्रम रुपलच्या घरात घुसला मात्र तिने त्याला कडाडून विरोध केला. जीव वाचण्यासाठी ती घराबाहेर पळू नजायचा प्रयत्न करत होती. ते पाहून आरोपी विक्रम घाबरला आणि तिचं तोंड बंद करण्यासाठी तिची हत्या केली, अशी कबुली त्याने दिली. पोलिस याप्रकरणी अजून तपाास करत आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र अद्यापही सापडलेले नाही.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.