काॅलेजबसला टेंपोची समोरासमोर धडक; शिक्षकाचा हात आणि पायही तुटला; 2 जागीच ठार; 20 विद्यार्थी गंभीर

अथणी शहरालगतच दोन्ही वाहनांमध्ये हा अपघात झाला. समोरासमोरा धडक बसल्याने दोन्ही वाहनाचे चालक जागीच ठार झाले, अपघातात वाहनाचे चालक ठार होताच स्कुलबसमधील मुलांनी हंबरडा फोडला होता.

काॅलेजबसला टेंपोची समोरासमोर धडक; शिक्षकाचा हात आणि पायही तुटला; 2 जागीच ठार; 20 विद्यार्थी गंभीर
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 2:51 PM

बेळगाव : अथणी-मिरज रोडवर (Athani Miraj Road) टेम्पो व कॉलेज बसची (College Bus Accident) समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार (2 Driver Death) तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या अपघातातील जखमी झालेले अनेक विद्यार्थी गंभीर जखमी असून ते अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकत होते. सकाळी कॉलेजवर विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे. टेंपोने स्कुल बसला दिलेली धडक इतकी भयानक होती, की, दोन्हीही वाहानातील चालक जागीच ठार झाले असून बसमधील ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसलेले विद्यार्थी आणि शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. कॉलेजबसच्या केबिनमध्ये बसलेल्या एका शिक्षकाचा हात आणि पायही तुटला असून शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे हा अपघात घडला असून अपघातानंतर काही वेळातच त्याठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अथणी-मिरज मार्ग

अथणी-मिरज रोडवर तीन किलोमीटर अंतरावर बनजवाड येथे हायस्कूल आणि कॉलेज आहे. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांना अथणी येथून घेऊन बस कॉलेजकडे निघाली होती. त्याचवेळी मिरजकडून अथणीकडे प्लास्टिक पाईप भरलेला आयशर टेम्पो येत होता.

दोन्ही ड्रायव्हर ठार

अथणी शहरालगतच दोन्ही वाहनांमध्ये हा अपघात झाला. समोरासमोरा धडक बसल्याने दोन्ही वाहनाचे चालक जागीच ठार झाले, अपघातात वाहनाचे चालक ठार होताच स्कुलबसमधील मुलांनी हंबरडा फोडला होता. मालवाहतूक करणाऱ्या टेंपोने कॉलेजबसला धडक दिल्याने दोन्ही वाहनांच्या समोरील केबिनचा चक्काचूर झाला होता. दोन्ही वाहनं समोरासमोर धडकल्याने दोन्हीवाहनातील ड्रायव्हर वाहनामध्येच अडकून पडले होते.

शिक्षकांचा हात-पाय तुटला

या भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या एका शिक्षकांचा हात आणि पाय तुटला आहे, तर बस चालकाच्या बाजूला बसून प्रवास करणारे काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. आमदार श्रीमंत पाटील यांनी घटनास्थळी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका पाठवून तातडीने जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोचवण्याचे काम केले आहे. घटनास्थळी पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.