Ambernath Railway Accident : लोकलमधून पडून कॉलेज तरुणी जखमी, अॅम्बुलन्स वेळेस न आल्याने 40 मिनिटं प्लॅटफॉर्मवरच

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी संध्याकाळी एक महाविद्यालयीन तरुणी लोकलमधून पडल्याची घटना घडली. तरुणी कॉलेजमधून घरी परतत असताना अंबरनाथजवळ हा अपघात घडला.

Ambernath Railway Accident : लोकलमधून पडून कॉलेज तरुणी जखमी, अॅम्बुलन्स वेळेस न आल्याने 40 मिनिटं प्लॅटफॉर्मवरच
लोकलच्या अपघातात जखमी तरुणीला 40 मिनिटे अॅम्बुलन्सची प्रतिक्षाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 9:07 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून एक कॉलेज तरुणी जखमी झाली. जखमी तरुणीला पोलिसांनी प्लॅटफॉर्मवर आणले. मात्र धक्कदायक बाब म्हणजे त्यानंतर ॲम्बुलन्स वेळेत न आल्यामुळे ही तरुणी जखमी अवस्थेत तब्बल 40 मिनिटं प्लॅटफॉर्मवरच पडून होती. या घटनेमुळे रेल्वे अपघातातील जखमींना योग्य वेळेत मदत मिळत नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. सध्या मुलीवर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. दरम्यान हा अपघात नेमका कसा घडला हे अद्याप कळू शकले नाही.

कॉलेजमधून घरी परतत असताना घडला अपघात

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी संध्याकाळी एक महाविद्यालयीन तरुणी लोकलमधून पडल्याची घटना घडली. दिव्या संजय जाधव असे या जखमी तरुणीचं नाव आहे. दिव्या कॉलेजमधून घरी परतत असताना अंबरनाथजवळ हा अपघात घडला.

जखमी अवस्थेत 40 मिनिटे प्लॅटफॉर्मवर पडून होती

यानंतर रेल्वे पोलिसांनी तिला उचलून अंबरनाथ रेल्वे स्थानकात आणलं. मात्र तिथे आल्यानंतर तिला रुग्णालयात पाठवण्यासाठी ॲम्बुलन्सच वेळेत आली नाही. त्यामुळे जखमी अवस्थेत ही तरुणी तब्बल 40 मिनिटं अंबरनाथ रेल्वे स्थानकात पडून होती.

हे सुद्धा वाचा

तरुणीवर कळव्याच्या रुग्णालयात उपचार सुरु

अखेर 40 मिनिटांनी ॲम्बुलन्स आल्यानंतर तिला आधी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं. या घटनेमुळे रेल्वे अपघातातील जखमींची होणारी वाताहत पुन्हा एकदा समोर आली आहे.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला? तरुणी लोकलमध्ये प्रवास करत असताना पडली की लोकलमध्ये चढताना याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. सध्या अपघाताचा तपास सुरु आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.