जुगार अड्ड्यावर धाड; औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना जुगार खेळताना रंगेहात अटक
अटट्ल जुगाऱ्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक देखील या जुगार अड्ड्यावर जुगार खेळत असल्याचे पोलिसांना दिसून आले. जनतेची सेवा करण्यासाठी जनतेने निवडून दिलेले नगरवेसक थेट जुगार अड्ड्यावर सापडल्याने औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या जुगारी नगरसेवकांना ताब्यात घेतले आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये(Aurangabad) काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना(Congress and NCP corporators) जुगार(gambling) खेळताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. औरंगाबादमधील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांसानी आज धाड टाकली. यावेळी अटट्ल जुगाऱ्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक देखील या जुगार अड्ड्यावर जुगार खेळत असल्याचे पोलिसांना दिसून आले. जनतेची सेवा करण्यासाठी जनतेने निवडून दिलेले नगरवेसक थेट जुगार अड्ड्यावर सापडल्याने औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या जुगारी नगरसेवकांना ताब्यात घेतले आहे.
औरंगाबादेत सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांसानी मोठा छापा टाकला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या बाजूलाच एका हॉटेलमध्येच हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. एका नगरसेवकाचाच हा जुगार अड्डा आहे.
महत्त्वाचा म्हणजे या जुगार अड्ड्यावर पन्नास वर लोक खेळत होते. या जुगाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आणि काँग्रेसचा एक नगरसेवक यांचा देखील समावेश होता. या नागरसेवकांपैकी एक जण हा जुगार अड्डा चालवत होता अशी माहिती सोमर आली अआहे.
दरम्यान छापा टाकल्यावर सर्व 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने पोलिसांनी सगळ्यांची मुक्तता केली आहे. मात्र, पोलीस आयुक्तालयाच्या बाजूलाच गेल्या कित्येक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू होता तरी देखील पोलिसांना कळाले कसे नाही? अशा प्रश्न उपस्थित करत नागरीकांनी याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या जुगार अड्यावर लोकप्रतिनिधींचा प्रत्यत्रात वावर असणं हे सुद्धा धक्कादायकच समजलं जातं आहे. नगरसेवकच जुगार खेळत असल्याने राजकीय वरदहस्तानेच हा जुगार अड्डा सुरु असल्याचा आरोप केला जात आहे.
जुगार अड्डयावरु 50 लोकांना ताब्यात घेत पोलिसांनी यावेळी 2 लाख 2 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . सोशल रमीच्या नावावर तीरट नावाचा जुगार या जुगार अडड्यावर खेळला जात होता. काँग्रेसचा माजी नगरसेवक अफसर खान हा जुगार अड्डा चालवत होता. त्यामुळे अफसर खान यांच्यासह 57 जनावर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.