आशिष शेलार पाठोपाठ काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रकांत हंडोरेंनाही जीवे मारण्याची धमकी, स्वपक्षीयांवरच आरोप!
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत चंद्रकांत हंडोरे यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यानं पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे निलेश नानचे असं हंडोरे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी हंडोरे यांच्यावर डंपर घालून अपघाती मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न झाला होता.
मुंबई : राज्यात राजकीय नेतेमंडळींना धमकीचं सत्र सुरुच आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना धमकीचा फोन आल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांनाही धमकी देण्यात आलीय. त्याबाबत हंडोरे यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी हंडोरे यांची तक्रार दाखल करुन घेत आरोपीचा शोध सुरु केलाय.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत चंद्रकांत हंडोरे यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यानं पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे निलेश नानचे असं हंडोरे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी हंडोरे यांच्यावर डंपर घालून अपघाती मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न झाला होता. तर हंडोरे यांना मारण्यासाठी एकाला सुपारीही दिली होती. ज्या व्यक्तीला सुपारी दिली होती त्यानेच हंडोरे यांना येऊन त्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर हंडोरे यांनी याबाबत मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून याविषयी गुन्हा दाखल केला होता.
हंडोरे यांचा स्वपक्षीयांवरच आरोप!
देलचंद्रकांत हंडोरे हे राजकीय चेहरा म्हणून समोर येत आहेत. अशावेळी काँग्रेस पक्षातील कुणीतरी नानचे याला समोर करुन आपली हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप चंद्रकांत हंडोरे यांनी केलाय. याबाबत पक्षाने आणि सरकारने दखल घेऊन त्वरित चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी हंडोरे यांनी केलीय.
आशिष शेलारांना धमकी देणारा अटकेत
आशिष शेलार यांनी अनोळखी नंबरच्या फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या फोन वरुनशेलार यांना धमकी देण्यात आल्याचं कळतंय. शेलार यांना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच परवाच्या दिवशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर शेलार यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर आता शेलार यांना धमकी देणाऱ्याला मुंबईच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
ओसामा समशेर खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचं वय 48 वर्षे आहे. गुन्हे शाखा आता या आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती मिळतेय. शेलार यांच्या वतीनं वांद्रे पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला होता. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीचा जमिनीबाबतचा एक वाद आहे आणि या वादामागे आशिष शेलार यांचा हात असल्याचा संशय या आरोपीला होता. त्यातूनच त्याने शेलार यांनी धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे.
इतर बातम्या :