नवी दिल्ली : चाणक्यपुरी पोलिसांनी एका ठगाला अटक केली आहे. तो हरियाणासाठी अंडर-19 क्रिकेट खेळलाय. मृणांक सिंह असं आरोपीच नाव आहे. त्याने जुलै 2022 मध्ये ताज पॅलेस हॉटेलला 5 लाख 53 हजार रुपयांना फसवलं होतं. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स टीमच प्रतिनिधीत्व करतो, असा त्याने दावा केला होता. आरोपी मृणांक सिंहने कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करुन भारतातील अनेक लक्जरी हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापकांना फसवलं आहे. तपासामधून हे समोर आलं. मृणांक सिंहने टीम इंडियाचा क्रिकेटपटू ऋषभ पंतला सुद्धा फसवलं आहे. 2020-2021 दरम्यान त्याने ऋषभला 1.63 कोटी रुपयांना फसवलं.
त्याने हॉटेल, बार, रेस्टॉरंट, युवा मुली, टॅक्सी ड्रायव्हर आणि फूड स्टॉलवाल्यांना सुद्धा सोडलं नाही. त्यांची सुद्धा फसवणूक केलीय. त्याचा मोबाइल चेक केला, त्यामधून तो महिला मॉडल्स आणि अनेक मुलींना ओळखत असल्याच स्पष्ट झालं. त्याच्या मोबाइलमध्ये सापडलेले व्हिडिओ आणि फोटो आपत्तिजनक आहेत. मृणांक सिंहला कोर्टात हजर करुन पोलिसांनी त्याची दोन दिवसांची कोठडी घेतली आहे. प्रकरणाचा पुढे तपास सुरु आहे. त्याचा मोबाइल फोनही तपासला जातोय. या प्रकरणात आणखी काही पीडित समोर येऊ शकतात.
हॉटेलवाल्यांना कोण बिल भरेल म्हणून सांगितलं?
आरोपी विरुद्ध 22 ऑगस्ट 2022 रोजी ताज पॅलेस हॉटेलच्या नवी दिल्ली सुरक्षा निर्देशकाने चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. स्वत:ला क्रिकेटर सांगणारा मृणांक सिंह 22 जुलै ते 29 जुलै 2022 रोजी ताज पॅलेस हॉटेलमध्ये उतरला होता. हॉटेलच 5,53,362 रुपये बिल चुकवल्याशिवाय तो तिथून निघून गेला. त्याला या बद्दल विचारलं, तेव्हा त्याने एडिडास कंपनी बिल भरेल असं सांगितलं.
बिल चुकवण्यासाठी ताज पॅलेस हॉटेलकडून अनेकदा मृणांक सिंह आणि त्याचा व्यवस्थापक श्री गगन सिंहशी मोबाइलवर संर्पक साधण्यात आला. ड्रायव्हरकडून कॅश पाठवून देतोय, असं उत्तर दिलं. पण कोणी हॉटेलमध्ये आलं नाही. रक्कम चुकवण्यासाठी आरोपीशी अनेकदा संपर्क साधला. पण प्रत्येकवेळी त्याने खोटी माहिती दिली.
संपत्तीतून बेदखल
सीआरपीसीच्या कलम 41ए अंतर्गत आरोपी मृणांक सिंहच्या पत्त्यावर नोटीस पाठवण्यात आली. पण तो तिथे नव्हता. मृणांकला संपत्तीमधून बेदखल केलय असं आरोपीच्या वडिलांनी सांगितलं. त्यांच मृणांकवर कुठलही नियंत्रण नाहीय. चाणक्यपुरी पोलिसांनी मृणांकला पकडण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पण काही समजल नाही. तो वारंवार आपली लोकेशन बदलून पोलिसांना चकवा देत होता.