Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा कॉपी बहाद्दर अटक, साथीदारांचा शोध सुरू…

nashik police : नाशिक पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे काही अशा वस्तू आढळून आल्या आहेत की, पोलिस चिंतेत पडले आहेत. पोलिस त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा कॉपी बहाद्दर अटक,  साथीदारांचा शोध सुरू...
Talathi Bharti 2023Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 10:08 AM

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात नुकतीच तलाठी परीक्षा (Talathi Bharti 2023) झाली. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली आहे. नाशिकच्या एका परीक्षा केंद्राबाहेर संशयास्पद व्यक्ती आढळून आल्याने पोलिसांना (nashik police) धक्का बसला आहे. त्या व्यक्तीची चौकशी केली असता, पोलिसांना त्याचा संशय आला आणि त्याला ताब्यात घेतले. स्पाय हेडफोन, वॉकीटॉकी, दोन मोबाईल, एक टॅब अशा काही वस्तू आढळून आल्या आहेत. गणेश शामसिंग गुसिंगे (ganesh shamsing gusinge) असं त्या व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती परीक्षा केंद्राच्या बाहेरुन मदत करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा कॉपी बहाद्दर अटक

महाराष्ट्रात वेगवेगळ्या केंद्रावर तलाठी या पदासाठी ऑनलाईन परीक्षा झाली. नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिंडोरी रोडवरील वेब इन्फोटेक सोल्युशन, प्रा. लि. या परीक्षा केंद्रावर तलाठी पदासाठी ऑनलाईन परीक्षा झाली. तिथं एक व्यक्ती फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. तो काही प्रश्नांची उत्तर संशयास्पद देत असल्यामुळं त्याची पोलिसांनी झडती घेतली.

त्या व्यक्तीच्या साथीदारांचा शोध

त्या संबंधित व्यक्तीकडे हायटेक साहित्य, कानात लावण्याचे स्पाय हेडफोन, वॉकी टॉकी, दोन मोबाईल, एक टॅब अशा वस्तू आढळून आल्या आहेत. गणेश शामसिंग गुसिंगे (रा. मु. संजारपुरवाडी, पोस्ट, परसोडा, ता. वैजापुर, जिल्हा औरंगाबाद) असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्या व्यक्तीकडील मोबाईल फोनमध्ये ऑनलाईन परीक्षेच्या संगणकावरील प्रश्नांचे फोटो मिळून आले आहेत, त्यामुळे पोलिस त्या व्यक्तीच्या साथीदारांचा शोध घेत आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आणखी किती व्यक्ती होत्या ?

पोलिसांनी ताब्यात घेतलेली व्यक्ती कोण होती. त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्रात एकचं व्यक्ती होती, की आणखी किती व्यक्ती होत्या ? इतर परीक्षा केंद्रात ही व्यक्ती मदत करीत होती का ? या सगळ्या प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.