सूटबूट घालून 4 लोक मजेत फिरत होते, तिघांकडे बॅगा होत्या, बॅग उघडताच पोलीस किंचाळले; महाराष्ट्राशी काय कनेक्शन?

केंद्र आणि राज्य सरकारने भ्रष्टाचार होऊ नये आणि नकली नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. त्यामुळेच प्रत्येक चेकपोस्टवर संशयितांची चौकशी केली जात आहे. शनिवारी गुजरातच्या एका चेकपोस्टवर चार तरुणांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे तीन बॅगा होत्या. या तीन बॅगा उघडताच...

सूटबूट घालून 4 लोक मजेत फिरत होते, तिघांकडे बॅगा होत्या, बॅग उघडताच पोलीस किंचाळले; महाराष्ट्राशी काय कनेक्शन?
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 3:23 PM

देशात सध्या एक फार मोठी समस्या आहे. ती म्हणजे नकली नोटांची. भ्रष्टाचारासारखीच ही समस्या अत्यंत मोठी आहे. या समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर मोठे प्रयत्न केले जात आहेत. बनावट नोटांचा सुळसुळाट बाजारात होऊ नये म्हणून पोलीस डोळ्यात तेल घालून संशयितांची चौकशी करत असतात. पण फेक करन्सीचे गुन्हे काही कमी होताना दिसत नाही. गुजरातमध्ये एक असच धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी चार लोकांना 2.57 कोटी रुपये मूल्य असलेल्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. यासोबत काही तरुणांना अटक केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी गुजरातमध्ये चार आरोपींना अटक केली आहे. चारही आरोपी सूटबूट घालून मजेत फिरत होते. यातील तिघांच्या हातात बॅग होती. हे चारही जण चेकपोस्ट जवळून जात होते. तेव्हा पोलीस आणि जवानांना या चौघांचा संशय आला. पोलिसांनी त्यांना हटकले. बॅगा चेक करायचं असल्याचं सांगितलं. सुरुवातीला त्यांनी बॅग चेक करण्यास मनाई केली. त्यामुळे पोलीस आणि जवानांचा संशय अधिकच बळावला. जवानांनी या तिन्ही जणांकडील बॅगा जप्त केल्या आणि त्या उघडल्या. या बॅगा उघडताच पोलीस आणि जवान किंचाळलेच. या तीन बॅगांमध्ये नोटा खच्चून भरलेल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे लोक रोकड कुठून घेऊन आले हे पोलिसांच्या लक्षात येईच ना? याबाबतची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.

500-200च्या करकरीत नोटा

पोलिसांना या तिन्ही बॅगांमध्ये 500 आणि 200 च्या करकरीत नोटा मिळाल्या आहेत. संपूर्ण बॅग नोटांनी भरलेली होती. त्यात कपडे बिलकूल नव्हते. किंवा इतर सामानही नव्हते. पोलीसही या नोटांची मोजणी करता करता थकून गेले एवढ्या नोटा होत्या. एकूण 2.57 कोटीची रोकड पोलिसांना सापडली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या सर्व नोटा नकली आहेत. 500 आणि 200 च्या सर्वच्या सर्व नोटा नकली निघाल्या आहेत. या नोटा नकली असल्याचं कळताच पोलिसांनी या चौघांनाही अटक केली. त्यांची तात्काळ चौकशी सुरू करण्यात आली आहे. या नोटा कुठून आल्या याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

महाराष्ट्राशी कनेक्शन काय?

हे चारही आरोपी महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर)चे रहिवासी आहेत. हे लोक तीन बॅगा घेऊन फिरत होते. या सर्वांना शनिवारी गुजरातच्या सरोली चेकपोस्टवर पकडण्यात आलं. सरोली पोलीस स्टेनशनच्या अधिकाऱ्यांच्या मते बॅगेत 500 रुपयांचे 43 बंडल होते. प्रत्येक बंडलमध्ये 1000, 500-500 च्या कोऱ्या करकरीत नोटा होत्या. या बंडलच्या सर्वात वर आणि सर्वात खाली ओरिजिनल नोटा होत्या. मध्ये सर्व बनावट नोटा होत्या. या शिवाय 200च्या नोटा असलेले बंडलही होते. लोकांची फसवणूक करण्यासाठी त्यांनी असं केलं. या नोटांवर कोणतेही सीरिअल नंबर्स नाहीत. या नोटांवर भारतीय मुलांचं अकाऊंट असं लिहिलं आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास सुरू आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.