सर्वच आशा संपल्या… पत्नीला कर्करोग, हजार रुपयांच्या इंजेक्शनसाठीही पैसे नाही, अखेर दाम्पत्याने आयुष्यच…

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅन्सर पीडित महिलेच्या उपचारांसाठी केरळवरून नागपूरमध्ये आलेल्या एका दांपत्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

सर्वच आशा संपल्या... पत्नीला कर्करोग, हजार रुपयांच्या इंजेक्शनसाठीही पैसे नाही, अखेर दाम्पत्याने आयुष्यच...
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 2:39 PM

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅन्सर पीडित महिलेच्या उपचारांसाठी केरळवरून नागपूरमध्ये आलेल्या एका दांपत्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे मरण्यापूर्वी त्या जोडप्याने त्यांच्या 12 वर्षांच्या मुलीला देखील विष दिले. मात्र ती मुलगी बचावली असून पती व पत्नी या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील विजयश्री नगर येथे ही दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अद्याप गंभीर आहे. रिजू नायर असे पतीचे तर प्रिया रिजू नायर असे मृत पत्नीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दांपत्य मूळचं केरळ येथील आहे. प्रिया रिजू नायर यांना ब्लड कॅन्सर झाला होता. त्यानी केरळमधील रुग्णालयात उपचार घेतले, मात्र फारसा फायदा न झाल्याने ते दांपत्य मुलीसह नागपूरमध्ये आलं. दोन महिन्यांपासून ते नागपूरमध्येच रहात होते. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र या उपचारांसाठी महागडी औषधं आणि इंजेक्शन घ्यावी लागत असल्याने त्यांचा आर्थिक विवंचना जाणवत होती.

पत्नीच्या उपचारांसाठी जवळचे सर्व जमा पैसे संपल्यावर त्यांनी कर्जही घेतले. पण डॉक्टरांनी सांगितलेले औषध, इंजेक्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नव्हते. सुरवातीला गावाकडून नातेवाईकांना मदत केली, पण वेळीच औषध न मिळू शकल्याने प्रिया यांना वेदना होत होत्या. अखेर त्या दोघांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. रीजु नायर यांनी पत्नी प्रिया आणि मुलीला शीतपेयातून विष दिलं आणि स्वतः ही विषयुक्त शीतपेय पिऊन आत्महत्या केली. त्यात पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला. मात्र त्यांची 12 वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली . तिची प्रकृती सध्या गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.