दोघेही हातात हात घालून लॉजमध्ये गेले… त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यातच बाहेर आले; असं काय घडलं पुण्यात?

पिंपरी-चिंचवड शहरातील एका लॉजमध्ये एका तरूणाने त्याच्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. एवढंच नव्हे तर त्याने त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

दोघेही हातात हात घालून लॉजमध्ये गेले... त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यातच बाहेर आले; असं काय घडलं पुण्यात?
पिंपरी चिंचवडमध्ये लॉजमध्ये हत्याकांड
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 11:23 AM

पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्ह्यांच्या घटना गेल्या काही दिवसांत प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेl. त्यातच शहरातून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एका लॉजमध्ये एका तरूणाने त्याच्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. एवढंच नव्हे तर त्याने त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली ती तरूणी सध्या रुग्णालयात असू तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लॉजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाला असावा असा संशय पिंपरी पोलिसांना असून ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लॉजमध्ये जाताना सीसीव्हीमध्ये झाले कैद आणि काही वेळातच….

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज लॉज मध्ये हा गुन्हा घडला. नितेश नरेश मिनेकर असे आत्महत्या केलेल्या माणसाचे नाव आहे. हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असावा असा अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तवला आहे. आरोपी नितेश मिनेकर हा आपल्या प्रेयसी सोबत लॉजमध्ये गेला. ते दोघं तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद धाले. मात्र लॉज मध्ये गेल्यानंतर काही वेळातच नितेश मिरेकर याने त्याच्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्याने त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. धारदार शस्त्राने वार केल्याने ती तरूणी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.