रेखा जरे हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठेला मोठा धक्का; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. | Rekha Jare Murder case
अहमनदगर: रेखा जरे हत्याप्रकरणाचा (Rekha Jare Murder Case) मुख्य सूत्रधार बाळ बोठे (Bal Bothe) याला बुधवारी न्यायालयाने मोठा धक्का दिला. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे बाळ बोठेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या सुनावणीत अॅड. महेश तवले यांनी बाळ बोठेच्या बाजून युक्तिवाद केला. मात्र, सत्र न्यायालयाने या युक्तिवाद फेटाळून लावला. (Court denies anticipatory to Bal Bothe)
BREAKING – #अहमदनगर – रेखा जरे हत्याप्रकरणी सूत्रधार बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बोठेच्या अडचणीत वाढ pic.twitter.com/VnMG23HmFM
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2020
सत्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलिसांची बाजू बळकट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस बाळ बोठेला पकडण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. मात्र, अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. बाळ बोठे देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. विमान प्राधिकरणाला तशा सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, बाळ बोठे फरार असल्याने पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अशात आज बाळ बोठेला जामीन मिळाला असता तर त्याला मोठा दिलासा मिळाला असता. बाहेर राहून तो कायदेशीर केस लढू शकला असता. या काळात बाळ बोठेने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असता. मात्र, सत्र न्यायालयाने बाळ बोठेला अटकपूर्व जामीन नाकारल्याने पोलिसांचे हात आणखी बळकट झाले आहेत.
हनी ट्रॅप वृत्तमालिकेमुळेच बाळ बोठेंना प्रकरणात गोवलं- अॅड. महेश तवले
बाळ बोठेंचे वकील महेश तवलेंनी या प्रकरणाचा हनी ट्रॅपशी संबंध जोडला. आणि हनी ट्रॅपमुळेच बाळ बोठेला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं महेश तवले म्हणाले. बाळ बोठे पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी वृत्तपत्रात हनीट्रॅपची मालिका चालवली. या वृत्तमालिकेत त्यांनी सागर भिंगारदिवेचं नाव घेतलं. सागर भिंगारदिवे हाच हनीट्रॅपचा मास्टरमाईंड असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यामुळेच त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद अॅड. महेश तवलेंकडून करण्यात आला.
हत्याकांडाच्या दिवशी बोठे भिंगारदिवे आणि जरेंच्या संपर्कात कशासाठी?- सरकारी वकील
हनीट्रॅपमधून जर बाळ बोठेला फसवण्यात आलं असेल तर मग सागर भिंगारदिवे आणि बाळ बोठेमध्ये इतक्या बैठका का झाल्या? हत्याकांडाच्या दिवशी बाळ बोठे सागर भिंगारदिवेशी संपर्कात कसा? आणि त्याच वेळी बाळ बोठेने रेखा जरेंना इतके फोन कशासाठी केले? असे प्रश्न विचारत सरकारी वकील सतीश पाटील यांनी तवलेंचा युक्तिवाद खोडून काढला. हनीट्रॅपबाबत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. हॅनीट्रॅपची पोलिसांनी चौकशीही केलेली नाही. त्यामुळे हत्याकांडाचा आणि हनीट्रॅपचा काहीही संबंध नसल्याचा दावा पाटील यांनी केला.
बाळ बोठेसमोर आता फक्त दोन पर्याय
फरार आरोपी बाळ बोठेचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने त्याच्यापुढे आता 2 पर्याय उरले आहे. यातील पहिला पर्याय आहे, पोलिसांना शरण येण्याचा. बाळ बोठेनं पळ न काढता, पोलिसांना शरण यावं आणि त्यानंतर कायद्याची लढाई सुरु करावी, असा पर्याय त्याच्यापुढे आहे.
तर दुसऱ्या पर्यायात बाळ बोठे औरंगाबाद खंडपीठाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करु शकतो. यासाठी त्याला पोलिसांत हजर होण्याची गरज नाही. वकिलांमार्फतच तो औरंगाबाद खंडपीठाकडे अर्ज करेल आणि जामीन मिळण्याची वाट पाहील.
एक फोटोमुळं आरोपी गजाआड
गाडीला कट मारण्याचा कारण पुढं करत, जातेगावच्या घाटात 4 आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. आणि त्यानंतर त्यांच्यावर वार करत त्यांची हत्या केली. रेखा जरेंशी वाद घालण्यासाठी जेव्हा हे आरोपी आले, तेव्हा रेखा जरेंचा मुलगा कुणाल जरेनं त्यातील एका आरोपीचा फोटो काढला. आणि हत्याकांडानंतर हाच फोटो बाळ बोठेपर्यंत पोहचण्याचा मुख्य पुरावा ठरला. याच फोटोच्या आधारे हत्या करणाऱ्या चारही आरोपींनी बेड्या ठोकण्यात आल्या. शिवाय त्यांच्या चौकशीतूनच बाळ बोठेचं नाव समोर आलं.
संबंधित बातम्या :
जातेगावच्या घाटात हिरो झालेला बाळा बोठे, जातेगावच्या घाटातच व्हिलन कसा झाला?
रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं ‘मटेरियल’ वाचलंत?
(Court denies anticipatory to Bal Bothe)