Crime : ‘लिव्ह इन’चा धक्कादायक अंत, उल्हासनगरातील महिलेची हत्या करणाऱ्याला बेड्या, लिव्ह इन जोडीदाराने केली होती महिलेची हत्या
पतीच्या मृत्यूनंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेची तिच्या जोडीदारानेच हत्या केल्याची घटना उल्हासनगरात घडली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी तांत्रिक तपास करुन इगतपुरीहून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ठाणे : उल्हासनगरमधील (Thane) चिंचपाडा गावात सुकन्या आव्हाड ही महिला अनिल भातसोडे याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relationship) होती. सुकन्याच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने पहिल्या पतीच्या तीन मुलांसोबत ही महिला (Woman) अनिलसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. अनिल हा तिच्याशी लग्न करण्याची मागणी करत होता. मात्र, तो खूप दारू पीत असल्याने सुकन्या लग्नासाठी तयार नव्हती. दारू सोड, मगच लग्न करेन, अशी अटच सुकन्याने घातली होती. यावरुन सुकन्या आणि अनिलमध्ये वारंवार वाद व्हायचे. असाच वाद 12 मार्चला झाला. अनिल याने सुकन्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही मारहाण वाढली आणि त्याने तिचं डोकं भिंतीवर आपटलं. यावेळी मुलगी आकांक्षा हिने आईची सुटका केली. मात्र, या मारहाणीमुळे त्रास झाल्याने सुकन्याला (Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 15 मार्च रोजी सुकन्याचा घरातच मृत्यू झाला.
सापळा रचून आरोपीला बेड्या
या घटनेनंतर मुलगी आकांक्षा हिने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अनिल भातसोडे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, अनिल हा 12 मार्चपासून फरार झाला होता. त्याच्याकडे मोबाईल नसल्याने तो अनोळखी लोकांना आपला मोबाईल चोरीला गेल्याचे सांगत त्यांच्या फोनवरून त्याच्या भावाला संपर्क करत होता. मात्र, दरवेळी तो दुसऱ्याच्या नंबरवरुन फोन करत असल्याने पोलिसांना त्याचा पत्ता लागत नव्हता. अखेर एकदा त्याने ज्या नंबरवरुन फोन केला, तो नंबर रेल्वे प्रवासात असल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलिसांनी रस्त्याने प्रवास करत इगतपुरी रेल्वे स्थानकात सापळा रचला आणि अनिल भातसोडे याला बेड्या ठोकल्या.
‘लिव्ह इन’चा धक्कादायक अंत
सुकन्या आव्हाड ही ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गावात राहत होती. तिच्या पतीचे निधन झाल्याने ती अनिल भातसोडे याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्य राहू लागली. यानंतर अनिल याने तिच्याकडे अनेकदा लग्नाची मागणी घातली. वारंवार अनिल सुकन्याकडे लग्नाची मागणी घालायचा आणि सुकन्या त्याला दारू सोडल्यावरच लग्न करेल, असं म्हणायची. यावरुन या दोघांमध्ये वारंवार वादही व्हायचे. मात्र, 12 मार्चला धक्कादायक प्रकार घडला. अनिलने सुकन्याशी वाद घालायला सुरुवात केली. यावेळी त्याने तिला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण वाढतच गेल्याने वाद वाढला. यावेळी अनिलने सुकन्याचे डोके भिंतीवर आपटले. यावेळी डोक्याला गंभीर इजा झाल्याने सुकन्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, 15 मार्चला सुकन्याचा घरातच मृत्यू झाला. 12 मार्चला घडलेल्या मारहाणीच्या घटनेपासून आरोपी अनिल फरार होता. पोलिसांनी सापळा रचून अखेर आरोपीला अटक केली.
इतर बातम्या