नवरा रेशन दुकानात, पत्नी घरी एकटीच… घरी आल्यावर पाहताच पायाखालची जमीन सरकली; ‘या’ घटनेने जळगावकर हादरलेच
जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरामागील बाजूला असलेल्या रणछोड नगर परिसरात राहणारे राजेश नवाल यांचे दाणाबाजारात धान्याचे दुकान आहे. गुरुवारी ते दुकानात गेले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भावाची पत्नी देखील मंदिरात गेलेली होती
सध्या सगळीकडे नवरात्रीची धूम सुरू आहे, सणा-सुदीच्या दिवसांत लोकंही उत्साहत दिसत आहेत. मात्र याच काळात गुन्ह्यांच्या घटनाही वाढताना दिसत आहे. नवरात्रीच्या दिवसांत जळगावमध्ये एक भयानक घटना घडली आहे. पंचमुखी हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या परिसरातील एक घरात 57 वर्षांच्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. भरवस्तीतील घरात महिलेच्या घरात घुसून तिच्या डोक्यात वार करून हत्या करण्यात आली. सुवर्णा राजेश नवाल असे मृत महिलेचे नाव असून त्या घरात एकट्याच होत्या. त्यांचे पती दुकानात गेले होते, रात्री घरात आल्यावर समोर जे पाहिलं ते त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात त्यांची पत्नी, सुवर्णा या रक्त्याच्या थारोळ्यात पडल्या होत्या. घटनास्थळी दाखल होत पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. ही निर्घृण हत्या करणारा आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. मात्र भरवस्तीत रात्री 9 वजेच्या वेळी महिलेची हत्या झाल्याच्या घटनेने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नवरा दुकानात गेला आणि…
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरामागील बाजूला असलेल्या रणछोड नगर परिसरात राहणारे राजेश नवाल यांचे दाणाबाजारात धान्याचे दुकान आहे. गुरुवारी ते दुकानात गेले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भावाची पत्नी देखील मंदिरात गेलेली होती. राजेश नवाल यांच्या पत्नी सुवर्णा नवाल ( वय 57) या घरी एकट्याच होत्या.
रात्री 9 च्या सुमारास राजेश नवाल हे घरी आले असता घरात पत्नी सुवर्णा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसल्या. ते पाहून ते हादरलेच. मयत सुवर्णा नवाल यांच्या पश्चात 2 मुली आणि १1मुलगा असा परिवार आहे. एक मुलगी विवाहित असून मुलगा आणि मुलगी नोकरीनिमित्त पुणे, मुंबई येथे असतात. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. सुवर्णा यांच्या मृत्यूमुळे नवले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून आसपासच्या परिसरात, नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण आहे. ही हत्या करणारा आरोपी फरार असून हे हत्याकांड नेमकं कसं, आणि कोणत्या कारणाने घडली हे अद्याप समजू शकले नसून तपास सुरू आहे.