हद्द झाली आता ! बसचं स्टेअरिंग कंडक्टरच्या हाती, ड्रायव्हर महिलेच्या शेजारी बसला अन् नको ते चाळे…

राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं उघडकीस येत आहेत. महिला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच पुण्याजवळ चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे

हद्द झाली आता ! बसचं स्टेअरिंग कंडक्टरच्या हाती, ड्रायव्हर महिलेच्या शेजारी बसला  अन् नको ते चाळे...
बस चालकाने केला महिलेचा विनयभंग
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 8:28 AM

राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं उघडकीस येत आहेत. महिला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच पुण्याजवळ चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेत बस ड्रायव्हर हाच आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्याने बसचे स्टिअरिंग कंटडक्टरच्या हाती दिलं आणि त्याने महिलेशेजारी बसून नको ते चाळे सुरू केले. इंदापुरजवळ चालत्या बसमध्ये ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनपसार, ज्या बसमध्ये ही घटना घडली ती स्वारगेट अक्कलकोट या मार्गावर जात होती. बस इंदापूरजवळ आली असातान हा घृणास्पद प्रकार घडला. पीडित महिला बसमधून प्रवास करत होती. तर आरोपी हा बस चालवत होता. मात्र त्याने अचानक गाडीच स्टिअरिंग हे बसमधील ड्रायव्हरच्या हातात दिलं आणि तो त्या महिलेशेजारी जाऊन बसला. त्यानंतर त्याचे घृणास्पद चाले सुरू झाले. त्याने त्या महिलेच्या शेजारी बसून तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करत तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने कसाबसा बचाव केला. आणि खाली उचरल्यावर आधी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लदर बस ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

इंदापुरात अज्ञाताकडून गोळीबार, 1 जखमी

बारामती मधील घटना ताजी असतानाच इंदापुरात अज्ञाताने एकावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एक इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. राहुल चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा असून त्याला तीन गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याते समजते.

एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आली. त्याने राहुलला टार्गेट करत तीन ते चार राऊंड फायर केले. त्यापैकी तीन गोळ्या त्याला लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला.

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.