Pune News : जेवणात भाकरी न मिळाल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेचा हॉटेलमध्ये राडा, अनेकांना मारहाण, नंतर…

| Updated on: Apr 24, 2023 | 11:02 AM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूतन सुर्वे या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रचंड मद्यपान केले होते. जेवणात भाकरी न दिल्याने सुर्वे या संतापल्या.

Pune News : जेवणात भाकरी न मिळाल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेचा हॉटेलमध्ये राडा, अनेकांना मारहाण, नंतर...
pune market yard
Image Credit source: tv9marathi
Follow us on

पुणे : जेवणात भाकरी न मिळाल्याने मद्यधुंद अवस्थेतील एका महिलेने उपहारगृहात गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या महिला पोलीस (Woman police) कर्मचाऱ्याला त्या महिलेने मारहाण केल्याची घटना मार्केटयार्ड (pune market yard) भागात घडली. हा प्रकार घडल्यापासून सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर त्या महिलेवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी (pune police) जाहीर केले आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच उपहारगृहात गोंधळ घातल्याप्रकरणी महिलेस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नूतन सुभाष सुर्वे (वय ४५, रा. केदारीनगर, वानवडी) असं त्या संबंधित महिलेचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूतन सुर्वे या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रचंड मद्यपान केले होते. जेवणात भाकरी न दिल्याने सुर्वे या संतापल्या. त्यांनी उपाहारगृहातील कामगार आणि व्यवस्थापकास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याबरोबर उपहारगृहात जेवण करणाऱ्या ग्राहकांच्या ताटात देखील पाणी ओतले, तसेच ग्राहकांना तिने शिवीगाळ केली. हॉटेल चालकांनी पोलिसांना माहिती दिली त्यावरून पोलीसानी कारवाई केली आहे.

पोलिसांना संबंधित महिलेला ताब्यात घेतलं आहे. मद्यधुंद अवस्थेत हा सगळा प्रकार घडल्यामुळे अनेक ठिकाणी चर्चा सुरु आहे. पोलिस त्या महिलेची कसून चौकशी करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात आणि देशात अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा प्रकरणात पोलिसांनी संबंधित आरोपीवरती गुन्हा देखील केला आहे. तरी सुध्दा अशा पद्धतीचे अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. त्याचबरोबर पुण्यात कोयता हातात घेऊन दहशत निर्माण केली जात आहे. अनेकांवरती जबरी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारंवार नव्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांनी डोके दुखी अधिक वाढली आहे.