जळगावात भयंकर हिट अँड रन, महिला फुटबॉलसारखी उडाली, थरकाप उडवणारा Video व्हायरल
जळगाव तालुक्यातील वावडदे ते जळके रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या फुटेजमधून अपघात कसा झाला हे दिसून येत आहे. रस्ता ओलांडत असताना अनियंत्रित कारने महिलेला धडक दिल्यानंतर ही महिला फुटबॉलसारखी उंच उडाली आणि जागेवर आपटली. त्यानंतर ही कार...
दोन दिवसांपूर्वी जळगावात झालेल्या एका हिट अँड रनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एक महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या कारने तिला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की महिला फुटबॉलसारखी उडून खाली पडली. महिलेला लागलेली धडक एवढी जबर होती की महिला पुन्हा जागची उठलीच नाही. त्या अपघातात गंभीर जखमी झाल्या. महिलेला ठोकर मारल्यानंतर कार सुसाट वेगाने पुढे निघून गेली अन् पलटी झाली. अंगाचा थरकाप उडेल असा हा व्हिडीओ असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
जळगाव तालुक्यात पुन्हा एकदा रविवार 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ‘हिट अँड रन’ ची घटना घडली. एका भरधाव कारने दुचाकीस्वार आणि पायी जाणाऱ्या महिलेला जबर धडक दिली. त्यानंतर कार पलटी झाल्यानंतर कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातातील CCTV फुटेज आज समोर आले आहे.
रस्ता ओलांडत असतानाच…
कार वावडदाच्या दिशेने भरधाव येत होती. वावडदा चौफुलीवर सुमनबाई भिका राजपूत ही महिला डोक्यावर भांडं घेऊन रस्ता ओलांडत होत्या. रस्ता पूर्ण खाली होता. एक दोन जण रस्त्यावरून वावरत होते. तितक्यात एक बाईक आली. ही महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने एक कार समोरून आली. ही कार अनियंत्रित झाली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमनबाईंना या कारने जोराची धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की सुमनबाई फुटबॉल सारख्या उडाल्या आणि खाली कोसळल्या. या भीषण अपघातात सुमनबाई गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बाईकला उडवलं अन् कार पलटी झाली
ही कार एवढ्यावरच थांबली नाही. कारने एका दुचाकी स्वाराला धडक दिली अन् पुढे जाऊन उलटली. यात कारमधील तिघे आणि इतर दोनजण असे पाचहीजण जखमी झाले आहेत. या सर्वांवर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजसमोर आला आहे. भरधाव कारने एका महिलेला धडा दिल्यानंतर महिला फुटबॉल सारखी उंच उडून रस्त्यावर पडत असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यानंतर कार निघून जाते. त्या ठिकाणचे ग्रामस्थ कारचा पाठलाग करतात.तर काहीजण जखमी महिलेला उचलून तात्काळ रुग्णालयात नेताना दिसत आहेत. या अपघाताना नंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.