80 लाखांचा विमा, पैशांचा हव्यास आणि जीवघेणे कारस्थान ! भावानेच रचला हत्येचा रक्तरंजित प्लॅन अन् …
पैशांसाठी माणूस कोणत्यााही थराला जाऊ शकतो असं म्हणतात. ते खरं करणारी एक भयानक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. जिथे विम्याचे लाखो रुपये मिळवण्यासाठी एका इसमाने त्याच्याच्या मामेभावाचा खून केला आणि त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवले.
पैशांसाठी माणूस कोणत्यााही थराला जाऊ शकतो असं म्हणतात. ते खरं करणारी एक भयानक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. जिथे विम्याचे लाखो रुपये मिळवण्यासाठी एका इसमाने त्याच्याच्या मामेभावाचा खून केला आणि त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवले. याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील सालेकशा तालुक्यातील महाराजी टोला येथील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. खुनाचा हा दुर्दैवी प्रकार छत्तीसगडमध्ये घडला. आरोपीने खून करून मृतदेह रस्त्यालगनत फेकून दिला होता. अखेर पोलिसांनी या ब्लाईंड मर्डर केसचा उलगडा करून तिन्ही आरोपींना अटक केली. उत्तम जंघेल असे मृत व्यक्तीचे नाव असून हेमंत ढेकवार, सुरेश मच्छिरके आणि प्रेमचंद लिल्हारे अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत ढेकवार हा गोंदिया जिल्ह्यातील सालेकशा तालुक्यातील महाराजी टोला येथील रहिवासी आहे. तर मृत उत्तम जंघेल हा त्याचा मामेभाऊ होता. आरोपीने जानेवारी 2024 मध्ये महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ गाडी आणि फेब्रुवारी 2024 मध्ये एक हार्वेस्टर हे त्याच्या नावाने फायनान्स करून विकत घेतले. तसेच मृत उत्तम याच्या नावाने भारतीय जीवन विमा निगम यांच्याकडून 40 लाखाचा विमा आणि आमगाव शहरातील ॲक्सिस बँक येथून 40 लाखाचा विमा उतरवला आणि त्या विम्याचे पैसे आरोपी स्वतः भरत होता.
मृतक उत्तम जंघेल मध्यप्रदेश याला ही गोष्ट समजातचा त्याने आपल्या भावाकडे दुचाकी मागितली. मात्र आरोपी हेमंत ढेकवार याच्या मनात काळबेरं होतं. जर आपण आपल्या भावाल मारलं आणि अपघात दाखवला तर विम्याचे पैसे माफ होतील आणि 80 लाख रुपये आपल्याला मिळतील, अशी लालसा त्याच्या मनात जागली झाली. त्याप्रमाणे त्याने खुनाचा प्लान आखला. त्यानंतर त्याने आपल्या भावाल दुचाकी घेऊन देण्याचे आश्वासन दिले. त्याला बालोवले आणि छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील खैरागड जंगलात नेऊन त्याचा गळा दाबून हत्या केली. यावेळी हेमंत याच्यासोबत त्याचे साथीदार सुरेश मच्छिरके, प्रेमचंद लिल्हारे हे होते.
उत्तम याचा अपघाती मृत्यू दाखवण्यासाठी त्या तिघांनी चक्क त्याच्या तीन वेळा कार चालवली आणि त्याला तशाच अवस्थेत फेकून आपल्या गावी निघून आले. छत्तीसगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृताच्या शवविच्छेदन अहवालामध्ये या हत्येचे बिंग फुटले. आणि विम्याच्या पैशांसाठी मामे भावाचाचा खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सर्व आरोपींना महाराष्ट्रातून नेऊन छतीसगड राज्यात पोलीस स्टेशन येथे नेण्यात आल्यात आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.