बंदुकीने फटाका फोडण्याची हौस जीवावरच बेतली, ‘ नको त्या जागी’ बसला फटाका आणि…

फटाके वाजवण्याची बंदूक चालवणं त्या माणसाला खूपच महागात पडलं. कारण तो फटाका थेट त्याच्या प्रायव्हेट पार्टवर लागला आणि त्यानंतर

बंदुकीने फटाका फोडण्याची हौस जीवावरच बेतली, ' नको त्या जागी' बसला फटाका आणि...
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 12:53 PM

गाझियाबाद | 14 नोव्हेंबर 2023 : दिवाळी म्हटलं की आतिषबाजी आणि फटाके हे आलेच. वाढत्या प्रदूषणामुळे सरकारतर्फे फटाके न फोडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र तरीही लोक थोड्याफार प्रमाणात का होईना फटाके फोडतातच. अशाच रितीने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्येही दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यात येत होते. मात्र तेच एक इसमाला भलतंच महागात पडलं.

खरंतर फटाका फोडणारी बंदूक फायर करणं त्याच्या जीवावरच बेतलं. कारण बंदुकीतून निघालेला तो फटाका एका इसमाच्या प्रायव्हेट पार्टवर जाऊन लागला, ज्यामुळे त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. बघता-बघता परिसरात तणाव निर्माण झाला. सध्या पोलिस याप्रकरणी कारवाई करत आहेत.

फटाक्याच्या बंदुकीने केलं फायरिंग

खरंतर हे प्रकरण लिंक रोड भागातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिवाळीच्या रात्री झंडापुर भागात प्रदीप नावाच्या इसमाने अफजल उर्फ नाटू (वय 40) याच्यावर फटाके फोडण्याच्या बंदूकीने फायर केले, मात्र तो फटाका अफजलच्या प्रायव्हेट पार्टवर लागला. यामुळे गंभीर जखमी झालेल्या अफजलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने तेथे त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी फरार

यानंतर आरोपी प्रदीप फरार झाला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. याप्रकरणी त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार आरोपी प्रदीप आणि पीडित अफजल हे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. हे प्रकरण वेगवेगळ्या धर्माच्या लोकांशी संबंधित असल्याने संवेदनशीलता लक्षात घेऊन परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.