पळून गेलेल्या मुलाला शोधायला आला पण… वृद्ध बापाने मुलाचा काटा का काढला ?

मुंबईतील गुन्ह्यांच्या घटनेने सामान्य नागरिक भयभीत झाले असून जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. त्यातच आता दादरसारख्या मध्यवर्ती भागात एका वद्धाने तरूणाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. यामुळे पर्चंड खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्याने हत्या केली तो त्या तरूणाचा पिताच होता.

पळून गेलेल्या मुलाला शोधायला आला पण... वृद्ध बापाने मुलाचा काटा का काढला  ?
वृद्ध बापाने मुलाला संपवलं
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 9:41 AM

मुंबईतील गुन्ह्यांच्या घटनेने सामान्य नागरिक भयभीत झाले असून जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. त्यातच आता दादरसारख्या मध्यवर्ती भागात एका वद्धाने तरूणाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. यामुळे पर्चंड खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्याने हत्या केली तो त्या तरूणाचा पिताच होता, असेही समोर आले आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी 80 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपीनेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. आरोपीनेच पोलिस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा कबूल केल्याने पोलिसही चक्रावले. मात्र अखेर त्यांनी त्याल अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्वर काळे असे मृत तरूणाचे नाव असून तो 35 वर्षांचा होता. तर युवराज काळे (वय 80) असे वृद्ध आरोपीचे नाव आहे. युवराज काळे हे छत्रपती संभाजी नगर येथील लासूर रेल्वे स्थानकासमोर आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांचा मुलगा अन्वर हा वारंवार मुंबईला पळून जायचा. गेल्या आठवड्यात देखील तो मुंबईला पळून आला होता. त्याचा शोध घेण्यासाठी युवराज काळे हे मुंबईत आले होते.

रविवारी त्या दोघांची भेट झाली. त्यानंतर दुपारी 2.30 च्या सुमारास पोर्तुगीज चर्च जवळील सॅल्वेशन शाळेजवळील पदपथावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. आणि रागाच्या भरात युवराज यांनी त्यांच्यासोबत आणलेला टाकून त्यांच्या मुलाच्या, अन्वरच्या पोटात डाव्या बाजूला खुपसला. गंभीर जखमी झालेला अन्वर तेथेच खाली कोसळला. मात्र त्याला तसंच जखमी अवस्थेत टाकून त्याचे वडील, युवराज हे तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनध्ये जाऊन स्वत:च्या गुन्हयाची कबुली दिली.

या घटनेबद्दल समजताच दादर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी अन्वरला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. रुग्णालयात अन्वरवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.