Crime News : प्रेमीयुगुल फिरायला गेलं, रात्री अंधारात बाईकसह विहीरीत पडलं, त्यानंतर अख्खं गाव रस्त्यावर आलं, नंतर…

या घटनेनंतर युवतीच्या पालकांनी तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके अधिक तपास करत आहेत

Crime News : प्रेमीयुगुल फिरायला गेलं, रात्री अंधारात बाईकसह विहीरीत पडलं, त्यानंतर अख्खं गाव रस्त्यावर आलं, नंतर...
sangali tasgaonImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 9:39 AM

सांगली : सांगली (Sangali) जिल्ह्यातील तासगाव (Tasgaon) तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. घटना घडल्यानंतर तिथं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे तरुण-तरुणी शेजारच्या गावातील असल्यामुळे सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. याबाबत तासगाव पोलिसात (Tasgaon Police Station) नोंद करण्यात आली आहे, त्याचबरोबर पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.

नेमकं काय झालं

रात्री घडलेल्या घटनेत युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर युवक बचावला आहे. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे. हे अल्पवयीन प्रेमीयुगुल गावाशेजारी असणाऱ्या एका ठिकाणी गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही वेळानंतर त्या युवतीला घरी सोडण्यासाठी तरुण निघाला होता. घरी परतत असताना वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण दुचाकीसह कोसळले.

युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला व रात्रीत चाचपडत विहिरीबाहेर आला, पण युवतीला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकांनी तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके अधिक तपास करत आहेत

हे सुद्धा वाचा

या घटनेबाबत तासगाव पोलीस स्टेशन मधून कळले असता भारती विद्यापीठ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमचे गजानन नरळे आणि एचईआरएफ रेस्क्यू टीम सांगली महेश कुमारमठ, फिरोज शेख, मारुती कोळी, यशवंत गडदे, सय्यद राजेवाले, निलेश शिंदे, अनिल कोळी, यांनी मृतदेह व मोटरसायकल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.