crime news : गर्लफ्रेन्डसाठी आयफोनची चोरी पचली, नंतर मित्रांसाठी फोन चोरायला गेला आणि घात झाला
चौकशीत आरोपीने कबूल केले की त्याला गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट करायचा होता. म्हणून ऑफीसमधून त्याने सर्वप्रथम दोन आयफोन चोरी केले होते. नंतर त्याला अशाप्रकारे झटपट पैसा कमवण्याचा छंदच लागला...
नवी दिल्ली : अॅपलचा आयफोन ( Apple iPhone ) स्वत: जवळ बाळगणं एक स्टेटस सिम्बॉल ( status symbol ) बनला आहे. परंतू सर्वांनाच काही अॅपलचा आयफोन परवडत नाही. परंतू आयफोन महाग असला तरी तो मिळविण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. आता एका ई-कॉमर्स ( e- commerce ) कंपनीत एका पोठापाठ आयफोन चोरीला जात होते. परंतू चोरी काही बाहेरच्या लोकांनी केली नाही तर काही आतल्या लोकांचा यात हात असल्याचे उघडकीस आले आहे.
दक्षिण-पूर्व दिल्लीच्या बिंदापूर परिसरातील एका ई-कॉमर्स कंपनीच्या कार्यालयातून लागोपाठ मोबाईल फोन चोरीच्या घटना घडल्याने कंपनीत गोंधळ उडाला होता. एकूण दहा लाख रूपये किंमतीचे आयफोन आणि अॅड्रोईड फोन चोरीला गेले होते. या प्रकरणात कंपनीतील मनिष ( 22 ), अमन (22) , दिलीप (38) आणि संजय ( 33) यांना अटक करण्यात यश आले. हे सर्वजण एकमेकांचे मित्र आहेत.
जेव्हा दिल्ली पोलीसांनी त्यांना पकडले तेव्हा एक इंटरेस्टींग गोष्ट उघडकीस आली, या सर्व कटाचा मास्टरमाईंड मनिष असल्याचे उघडकीस आले. चौकशीत त्याने कबूल केले की त्याला गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट करायचा होता. म्हणून ऑफीसमधून त्याने सर्वप्रथम दोन आयफोन चोरी केले होते. ही चोरी पचल्याने त्याला वाटले हा पैसा कमविण्याचा सोपा मार्ग आहे. मग त्याने त्याच्या तीन मित्रांना आपल्या कटात सामील केले. या चौघांनी आपल्याच कार्यालयातून सात आयफोन आणि सात अॅड्रॉईड फोन चोरी केले.
ऑडीट करताना उलगडा
कंपनीचे ऑडीट करताना ई- कॉमर्स कंपनीच्या मॅनेजर मनीष पंत यांना या चोरीचा उलगडा झाला. त्यानंतर त्यांनी पोलीसांना कळविले. पोलीसांनी सीसीटीव्ही तपासले तेव्हा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच फोन लंपास केले. शुक्रवारी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उत्तमनगर नजफगड रोडवर हे चौघे फोन विकायला येणार असल्याने सापळा रचून त्यांना पकडण्यात आले.
फोनना विकण्याची जबाबदारी संजयवर
पोलिसांनी घटनास्थळावरून मनिष, अमन आणि दिलीपला अटक केली. त्यांच्या जवळ पाच फोन मिळाले. त्यात दोन आयफोन आणि तीन एड्रोईड होते. त्यांच्या चौकशीत संजयचा उलगडा झाला, मग त्यालाही पकडले. त्याच्याकडून दोन आयफोन सापडले. या फोनना विकण्याची जबाबदारी संजयवर सोपविण्यात आली होती. तर उर्वरित लोक ऑफिसमधून फोन चोरायचे असे उघडकीस आले आहे.