Dombivli Crime : आईच झाली वैरी ! 2 वर्षांच्या चिमुकलीची तोंडावर उशी ठेवून केली हत्या

डोंबिवलीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरातील नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडाला आहे. शहरातील रुनवाल माय सिटी या हाय प्रोफाईल भागात दुहेरी मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.

Dombivli Crime : आईच झाली वैरी ! 2 वर्षांच्या चिमुकलीची तोंडावर उशी ठेवून केली हत्या
डोंबिवलीमध्ये दुहेरी मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे,
Follow us
| Updated on: Sep 23, 2024 | 2:56 PM

मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या डोंबिवलीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरातील नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडाला आहे. शहरातील रुनवाल माय सिटी या हाय प्रोफाईल भागात दुहेरी मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. तेथे एका महिलेने तिच्या पोटच्या पोरीची, अवघ्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केली. या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीच्या तोंडावर उशी दाबून तिचा जीव घेतला. एवढंच नव्हे तर त्यानंतर तिने स्वतः देखील गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली असून आई-मुलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवीलमधील रुनवाल माय सिटी या हाय प्रोफाइल परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. एका महिलेने स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलीला ठार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. पूजा राहुल सपकाळ (वय 29) असे महिलेचे नाव आहे.

मयत पूजा हिने हॉलमध्ये तिच्या दोन वर्षाच्या चिमुकलीच्या तोंडावर उशी ठेवून तिचा जीव घेतला. त्यानंतर तिने गळफास लावून घेत स्वतःचे जीवनही संपवलं. या घटनेची माहिती मिळताच डोंबिवली मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत महिला पूजा हिने असे कृत्य का केले , तिच्या घरात काही तणाव होता, तिचा पती यावेली कुठे होता, यामध्ये काही घातपात आहे का अशा सर्व बाजूंनी याप्रकरणाचा तपास करत आहेत. मायलेकीच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले.
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा.
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य.
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी.
'एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील...', कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?
'एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील...', कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?.
कसारा स्टेशनजवळ सिग्नलला एक्स्प्रेस थांबली अन् अचानक..; बघा काय झालं?
कसारा स्टेशनजवळ सिग्नलला एक्स्प्रेस थांबली अन् अचानक..; बघा काय झालं?.
चंद्रचूड-शिंदे एकाच मंचावर येणार, निमित्त काय? राजकीय वर्तुळात चर्चा
चंद्रचूड-शिंदे एकाच मंचावर येणार, निमित्त काय? राजकीय वर्तुळात चर्चा.
मंकीपॉक्स कसा पसरतो? तुम्ही कशी काळजी घ्या?
मंकीपॉक्स कसा पसरतो? तुम्ही कशी काळजी घ्या?.
खडसे नेमके कुणीकडे? ना BJPत प्रवेश झाला, ना NCP ने राजीनामा स्वीकारला?
खडसे नेमके कुणीकडे? ना BJPत प्रवेश झाला, ना NCP ने राजीनामा स्वीकारला?.
IC 814 कंदाहार हायजॅकची सत्यकथा; कशी झाली विमानातील प्रवाशांची सुटका?
IC 814 कंदाहार हायजॅकची सत्यकथा; कशी झाली विमानातील प्रवाशांची सुटका?.