Crime : उपचारासाठी आलेल्या मुलीला झोपेचं औषध देऊ करत होता बलात्कार, 23 वर्ष जुन्या प्रकरणात कारवाई
झोप आणि नैराश्याच्या उपचारासाठी आलेल्या मुलीशी एका डॉक्टरने संबंध ठेवले. वयाने मुलगी डॉक्टरपेक्षा तब्बल 31 वर्षांनी लहान होती. या धक्कादायक प्रकरणात 23 वर्षांनी करवाई झाली आहे.
दिल्ली : डॉक्टरांकडे (Doctor) आपण विश्वासाने उपचार (treatment) करण्यासाठी जातो. पालक मोठ्या विश्वासाने मुलांना डॉक्टरांकडे एकट्याने उपचारासाठी पाठवतात. त्याच विश्वासाने डॉक्टर देखील उपचार करतात. मात्र, डॉक्टरांच्या पेशाला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार इतका वाईट आहे. की तुमच्याही अंगावर काटा येईल. तुम्ही देखील काही वेळेसाठी अस्वस्थ व्हाल. एक मुलगी (girl) नैराश्य आणि झोप या दोन गोष्टींमुळे उपचार घेत होती. त्या 31 वर्षीय तरुणीसोबत डॉक्टरनं त्यावेळी संबंध ठेवले होते. ही मुलगी झोप आणि नैराश्याच्या उपचारासाठी दवाखान्यात येत होती. मात्र, उपचाराच्या नावाखाली डॉक्टरने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. या नराधम डॉक्टराच्या कृत्यावर तब्बल तेवीस वर्षांनी कारवाई होत आहे. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर अनेकांनी या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण ब्रिटनमधील आहे. त्यावेळी डॉक्टर 55 वर्षांचा होता. तर मुलगी ही 22 वर्षांची होती. त्याने या 22 वर्षांच्या मुलीशी संबंध ठेवले. ही मुलगी नैराश्येच्या समस्येनं ग्रासलेली होती. ती इतकी नैराश्येत गेली होती की तिला अनेक गोष्टी सुचायच्या देखील नाही. तिला स्वत:ला जगनेही कठीण झाले होते. याचाच गैरफायदा या नराधम डॉक्टरने घेतला. हा विवाहीत असलेला नराधम गोकसेल याने त्या तरुणीसोबत संबंध ठेवले. आता सध्या गोकसेल हा 78 वर्षांचा म्हातारा आहे. तर ही तरुणी 45 वर्षांची आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार त्या डॉक्टरचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
सुनावणीत काय निष्पन्न झालं?
अलीकडेच या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ट्रिब्युनलला सांगण्यात आलंय की 1999 मध्ये तपासणीदरम्यान गोकसेलने पहिल्यांदाच एका महिला रुग्णाला अयोग्यरित्या स्पर्श केला होता. गोकसेल याने त्या महिलेला झोपेच्या औषधांचा अधिक डोस दिला असल्याचं देखील तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात कडक करवाई करण्यात आली असून तडकाफडकी डॉक्टरचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
भीतीपोटी मुलीचे पलायन
या नराधम डॉक्टराच्या कृत्याला कंटाळून या मुलीने 2020मध्ये ब्रिटन सोडला. ती आधीच नैराश्येत होती. तिला झोपही निट लागत नव्हती. त्यामुळे तिने ब्रिटन सोडण्याचा निर्णय त्यावेळी घेतला. ती तिच्या आईसोबत राहण्यासाठी स्कॉटलंडला गेली. तेथे त्यांनी दुसऱ्या डॉक्टरकडून उपचार घेतले. पण, पुढची सात वर्षे गोकसेल तिला औषधे लिहून देत राहिला. तो पोस्टाने तिला औषधे पाठवत होता. झोपेच्या गोळ्या देऊन त्याने तिच्याकडे अनेकदा शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली.
इतर बातम्या
चांगभलं रं देवा चांगभलं, दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेस सुरुवात