Crime story : या कारणामुळे महाविद्यालयातील तरुण मोबाईल चोरायचे, मग…

त्यावेळी चौकशीत विद्यार्थ्यांनी शहर परिसरातून चोरलेले एकूण 22 मोबाईल आणि चोरीच्या वापरलेली दुचाकी असा एकूण 4 लाख 53 हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

Crime story : या कारणामुळे महाविद्यालयातील तरुण मोबाईल चोरायचे, मग...
nashik policeImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 9:13 AM

नाशिक : नाशिक (nashik) जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या (Mobile theft) घटनांमध्ये अधिक वाढ होत असल्यामुळे पोलिसांनी एक पथक तयार केलं. त्या पथकाने मोबाईल चोरणारी कॉलेजमधील टोळी ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे मोबाईल सुध्दा ताब्यात घेतले आहेत. पोलिस त्या विद्यार्थ्यांची (college student) कसून चौकशी करीत असून त्यामध्ये आणखी विद्यार्थी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांकडून 4 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

साडेचार लाखांचे 22 मोबाईल जप्त केले

मौज मजेसाठी मोबाईल खेचून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने बेड्या ठोकत त्यांच्याकडून चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून साडेचार लाखांचे 22 मोबाईल जप्त केले आहेत. विशेष म्हणजे हे संशयित महाविद्यालयात शिक्षण देखील घेत आहे.

संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मोबाईल खेचून जबरी लूटीच्या घटना समोर आल्या होत्या. या घटना लक्षात घेता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून सिडको येथील शांती नगर भागात राहणार संशयित चेतन निंबा पवार, पौर्णिमा बस स्टॉप परिसरात राहणारा संशयित शशिकांत सुरेश अंभोरे, जुने सिडको परिसरात राहणारा विजय सुरेश श्रीवास्तव या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.

हे सुद्धा वाचा

6 गुन्ह्यांची कबूली विद्यार्थ्यांनी दिली

त्यावेळी चौकशीत विद्यार्थ्यांनी शहर परिसरातून चोरलेले एकूण 22 मोबाईल आणि चोरीच्या वापरलेली दुचाकी असा एकूण 4 लाख 53 हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आडगाव 2, सातपूर 2, मुंबई नाका 1 आणि सरकारवाडा पोलीस ठाणे 1 अश्या 6 गुन्ह्यांची कबूली विद्यार्थ्यांनी दिली आहे. मौजमजा करण्यासाठी हे संशयित मोबाईल चोरी करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.