विद्येचं माहेर की गुन्ह्यांचं ? पुण्यात गुन्हेगारांचा हैदोस, 3 दिवसांत 5 खून आणि…
हे शहर विद्येचं माहेर आहे की गुन्ह्यांचं असा प्रश्न पडावा अशा काही घटना पुण्यात घडल्या असून गेल्या तीन दिवसांमध्ये शहरात चक्क 5 खून झाले आहेत. त्यामुळे प्रचंड खळबळ माजली असून नागरिकांमध्येही भीतीचं , दहशतीचं वातावरण आहे.
विद्येचं माहेर अशी ख्याती असलेल्या पुणे शहरात गेल्या काही काळापासून गुन्ह्यांच्या घटनाच जास्त वाढायला लागल्या आहेत. मे महिन्यात झालेलं पोर्श ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण असो किंवा त्यानंतर काही महिन्यांनी झालेलं वनराज आंदेकर खून प्रकरण. शहरात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्यामुळे सामान्य नागरिकांचा जीव मात्र धोक्यात आला असून ते जीव मुठीत धरून जगताना दिसत आहेत. शुल्लक कारणावरून वादावादी, भांडण, खून, मारामाऱ्या अशा अनेक घटना घडत असून कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हे शहर विद्येचं माहेर आहे की गुन्ह्यांचं असा प्रश्न पडावा अशा काही घटना पुण्यात घडल्या असून गेल्या तीन दिवसांमध्ये शहरात चक्क 5 खून झाले आहेत. त्यामुळे प्रचंड खळबळ माजली असून नागरिकांमध्येही भीतीचं , दहशतीचं वातावरण आहे.
तीन दिवसांत पाच खुनांच्या घटना
मागील तीन दिवसात पुणे शहरात खुनाचे 5 प्रकार घडले आहेत. पहिली घटना सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नरे परिसरात घडली. तेथे गाडीतील पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरून चार जणांनी १८ वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तर दुसऱ्या घटनेमध्ये सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच मंगळवारी रात्री , पूर्व वैमनस्यातून तीन अल्पवयीन तरुणांनी एका तरुणाचा खून केला. त्यामुळेही खळबळ माजली.
तिसरी घटना पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. तेथे काही अल्पवयीन तरुणांनी कोयत्याने वार करत एका अल्पवयीन तरुणाला संपवलं. तर खुनाची चौथी घटना वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. तर त्यानतंर कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या पाचही घटनांमुळे शहरात कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची नागरिकांकाडून मागणी होत आहे.