बीफ विकलं म्हणून, भर बाजारात धिंड काढली, आणि नग्न करुन…
गोमास विक्री केली म्हणून दोघांची आधी धिंड काढण्यात आली त्यानंतर मात्र त्यांना नग्न करुन जबर मारहाण केली गेली आहे.
नवी दिल्लीः छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बिलासपूरमध्ये गोमांस विक्री केल्याच्या आरोपावरून दोघांना स्थानिक लोकांनी रस्त्यावर बेदम मारहाण केली आहे. त्यांचे कपडे काढून नग्न पणे त्यांची धिंड काढण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओहा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्या व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, गोमांस विक्री करणाऱ्या या दोघांची नग्न करुन धिंड करण्यात आली आहे. धिंड काढताना या दोघांना बेल्टने मारहाण करण्यात येत होती.
हे प्रकरण बिलासपूरच्या चाकरभाठा पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. त्यानंतर याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक करण्यात आली. नरसिंग रोहिदास आणि रामनिवास मेहेर अशी आरोपींची नावं असल्याची पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांकडून सुमारे 33 किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. सुमित नायक नावाच्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली होती की, दुचाकीवरुव दोघे जण संशयास्पद वस्तू घेऊन जात होते.
त्याबाबत विचारले असता ते गोमांस असल्याचे त्यांनी मान्य केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यापूर्वीच त्यांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांनाच अटक केल आहे.
छत्तीसकडमध्ये गोमांस सापडण्याची किंवा गोहत्या होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी काही युवकांनी गायीचे तोंड बांधून गाईला काठीने मारहाण केली होती.
त्यानंतर त्या गाईला नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून देण्यात आले होते. विशेष गोष्ट म्हणजे या घटनेचा त्या तरुणांनी व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हायरलही केला होता. त्या व्हिडिओप्रकरणी पाच जणांना ताब्यातही घेण्यात आले होते.